PM Modi News Saam Tv
लोकसभा २०२४

PM Modi: पंतप्रधान मोदी १४ मे रोजी भरणार उमेदवारी अर्ज, १३ तारखेला वाराणसीत करणार मोठा रोड शो

Lok Sabha Election 2024: सातव्या टप्प्यात होणाऱ्या वाराणसी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ मे रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अर्ज भरण्याच्या एक दिवस आधी म्हणजे १३ मे रोजी वाराणसीमध्ये पंतप्रधान मोदींचा मोठा रोड शो होणार आहे.

साम टिव्ही ब्युरो

Varanasi Lok Sabha constituency:

सातव्या टप्प्यात होणाऱ्या वाराणसी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ मे रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अर्ज भरण्याच्या एक दिवस आधी म्हणजे १३ मे रोजी वाराणसीमध्ये पंतप्रधान मोदींचा मोठा रोड शो होणार आहे. मोदींच्या रोड शोसाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे.

मोदी सलग तिसऱ्यांदा वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. वाराणसीमध्ये सातव्या म्हणजेच शेवटच्या टप्प्यातील मतदान १ मे रोजी होणार आहे. ४ जूनला निकाल लागणार आहे. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यासाठी पंतप्रधान मोदी १३ मे रोजी संध्याकाळी वाराणसीला पोहोचतील. येथे ते भव्य रोड शो करणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रोड शोनंतर पंतप्रधान मोदी 13 मे रोजी बनारसमध्ये राहणार आहेत. १४ मे रोजी राज दाखल केल्यानंतर ते दिल्लीला परतणार आहेत. याबाबत भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील बन्सल यांनी अलीकडेच माहिती दिली होती. गेल्या वेळेप्रमाणे यावेळीही पंतप्रधानांचा रोड शो होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. दुसऱ्या दिवशी बाबा विश्वनाथ आणि गंगा यांचे आशीर्वाद घेऊन ते अर्ज दाखल करतील, असंही सांगितलं जात आहे.

वाराणसीमध्ये निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात १ जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी ७ ते १४ मे या कालावधीत उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रादेशिक समितीने पंतप्रधानांच्या उमेदवारी अर्जासाठी सर्व कागदपत्रांची तयारी सुरू केली आहे. पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेदवारी अर्ज भरण्याच्या एक आठवडा आधी दिल्लीला पाठवला जाईल आणि त्यातली सगळी माहिती व्यवस्थित तपासली जाईल. त्यानंतर हा अर्ज स्थानिक अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला जाईल. सेंट्रल बारचे अध्यक्ष मुरलीधर सिंह, ज्येष्ठ वकील शशांक शेखर त्रिपाठी आदींसह कार्यकर्त्यांची समिती उमेदवारी अर्ज तयार करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eye Care: डोळ्यांसाठी सर्वात महत्वाचे आहेत 'हे' व्हिटामिन, ९९% लोकांना माहिती नसेल

बाबोsss ! २० हजाराला कोथिंबीर जुडी, ४१ हजाराला एक नारळ, पाहा VIDEO

Gautami Patil New Song: सबसे कातील गौतमी पाटीलचं “राणी एक नंबर” गाणं प्रदर्शित

Jio-Airtel Recharge Plans: वाह क्या बात! डेटा रिचार्जचे सहा भन्नाट प्लॅन्स; फक्त ५ रुपयांत मिळेल इंटरनेट डेटा

मनोज जरांगे पाटील चौथी पास झालेत का? गुणरत्न सदावर्तेंचा रॅपमधून हल्लाबोल, VIDEO

SCROLL FOR NEXT