PM Modi in Latur Yandex
लोकसभा २०२४

PM Modi in Latur: भारत आज घरात घुसून मारतो; पंतप्रधान मोदींनी ठणकावून सांगितलं

PM Narendra Modi Speech In Latur: लातुरमध्ये महायुतीचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा पार पडत आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी भारतीय लष्कराचं कौतुक केलं आहे.

Rohini Gudaghe

संदीप भोसले साम टिव्ही, लातूर

लातुरमध्ये महायुतीचे उमेदवार सुधाकर शृंगारे (Mahayuti candidate Sudhakar Shrungare) यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा पार पडत आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी भारतीय लष्कराचं कौतुक केलं आहे. यावेळी जनतेशी संवाद साधताना त्यांनी मिशन एल.ओ.सीचा उल्लेख केला आहे. त्यांनी भारताने पाकिस्तानला सर्जिकल स्ट्राइक करून मारलं, याची आठवण करून दिलं आहे.

लातुरमध्ये बोलताना पीएम मोदींनी (PM Narendra Modi) मराठीतून भाषणाची सुरुवात केली. मला मजबूत करण्यासाठी शृंगारे यांना संसदेत पाठवा, असं आवाहन त्यांनी लातुरमधील जनतेला केलं आहे. भारताला तुकडे तुकडे पाहणारे लोक देशाला लुटण्याचं पाहत आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे. काँग्रेसने देशाला लुटण्यासाठी मोठा प्लॅन बनवला आहे. काँग्रेस तुमच्या संपत्तीवर कब्जा करू पाहत आहे. काँग्रेस पार्टीच्या परिवारांनी स्वतःच्या मुलांसाठी देशातील अनेक गोष्टी लुटल्या, असं म्हणत मोदींनी कॉंग्रेसवर टीका केली आहे.

यावेळी बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, 2014 च्या पूर्वीचे दिवस आठवा. अनेक ठिकाणी अनोळखी वस्तूंना हात लावू नका लिहिलं होतं. अनेक ठिकाणी अनोळखी वस्तूंना हात लावू नका लिहिलं (PM Narendra Modi Speech) होतं. ठिकठिकाणी बॉम्बस्फोट होत होते. पण आज भारताच्या सीमावर कुणाची नजर टाकण्याची हिंमत नाही.आज भारत घरात घुसून मारतो, असं त्यांनी ठणकावून सांगितलं आहे.

काँग्रेसच्या काळात रोज वर्तमानपत्रात नवीन भ्रष्टाचाराची बातमी होती. आज देशातील भ्रष्टाचारांच्या घरात किती सापडले, याची बातमी मिळत आहे. ज्यांनी ज्यांनी या देशाला लुटून नेले आहे , त्यांना पुन्हा देशाला परत करावे लागणार, असं म्हणत नरेंद्र मोदींनी कॉंग्रेसवर निशाणा ( PM Modi in Latur) साधला आहे.

पूर्वीचे जाचक नियम बदलत आहेत. देश प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत आहे. 2029 ला नॅशनल ऑलिंपिक भारतात होण्याचं स्वप्न असल्याचं मोदींनी सांगितलं आहे. त्यांनी देशाचं संविधान कोणीही बदलू शकत नाही, असं म्हटलंय. मोदी (PM Modi) म्हणाले की, लातूरकरांनी काँग्रेस पासुन सावधान झालं पाहिजे. कॉंग्रेसने ST,OBC वंचित यांना पुढे येऊ दिलं नाही. दहा वर्षात करोडो नागरिकांचं जीवन बदललं आहे.

लातूरमध्ये अनेक वर्ष पाण्याची टंचाई आहे, पण काँग्रेसने ती कधीही सोडवली नाही. जलयुक्त शिवार, मराठवाडा वॉटरग्रीड बंद केले आहेत. लातूर शिक्षण क्षेत्रात देशात एक नंबर आहे. लातूर आत्मनिर्भर भारताचं हब बनलं आहे. लातूरला विकसित भारताचे केंद्र बनण्यासाठी तुम्हाला मतदान (Maharashtra Lok Sabha Election) करायचं आहे, असं पीएम मोदींनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Methi Usal Recipe: झणझणीत मेथी उसळ कशी बनवायची? वाचा गावरान रेसिपी

मध्यरात्री रक्तरंजित थरार! २ सख्ख्या भावांवर अंदाधुंद गोळीबार, जागीच सोडले प्राण

Ranapati Shivray: दिग्पाल लांजेकरांच्या 'श्री शिवराज अष्टक'मधील सहावे पुष्प भेटीला; 'रणपति शिवराय स्वारी आग्रा'चा टिझर प्रदर्शित

Ankita Lokhande Dance Video: 'मैं तो अपने साजन के द्वार चली रे...' अभिनेत्री अंकिता लोखंडेने केला भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल

मुंबईत महायुतीचा महापौर मराठीच! तुमचा महापौर कुठल्या मोहल्ल्यातून? आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंना खोचक सवाल|VIDEO

SCROLL FOR NEXT