Parbhani Loksabha Constituency News:  Saamtv
लोकसभा २०२४

Parbhani Loksabha Result: परभणीत ओन्ली संजय जाधवचं बॉस! खासदारकीची हॅट्रिक; महादेव जानकरांचा पराभव

Parbhani Loksabha Constituency News: परभणीमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या संजय जाधव यांनी बाजी मारत हॅट्रिक मारली आहे. संजय जाधव यांनी रासपच्या महादेव जानकर यांचा पराभव केला आङे.

Gangappa Pujari

राजेंद्र काटकर, परभणी, ता. ४ जून २०२४

परभणी लोकसभा मतदार संघाचा अंतिम निकाल समोर आला आहे. परभणीमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संजय जाधव यांनी विजय खेचून आणत खासदारकीची हॅट्रिक केली असून रासपच्या महादेव जानकर यांना पराभवाचा धक्का बसला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव 1 लाख 30 हजाराच्या फरकाने विजयी झाले आहेत.

परभणी लोकसभा मतदार संघात शिवसेना ठाकरे गटाचे विद्यमान खासदार संजय जाधव विरुद्ध महायुतीकडून रासपचे महादेव जानकर यांच्यामध्ये लढत झाली. त्याचबरोबर हवामान अंदाजक म्हणून शेतकरी वर्गामध्ये प्रसिद्ध असणारे पंजाबराव डख यांनीही अपक्ष अर्ज भरला होता. मात्र या लढतीत संजय जाधव यांनी बाजी मारली.

आजच्या मतमोजणीत संजय जाधव यांनी पहिल्यापासून आघाडी घेतली होती. अखेर त्यांचा तब्बल एका लाखांच्या मतांनी विजय झाला. संजय जाधव यांच्या या विजयाने ठाकरे गटाने ३५ वर्षांचा किल्ला अभेद्य ठेवला असून महादेव जानकर यांना चौथ्यांदा खासदारकीने हुलकावणी दिली आहे.

दरम्यान, सुरूवातीला महादेव जानकर हे माढ्यातून लढणार असल्याची चर्चा होती. मात्र अजित पवार गटाने त्यांची मनधरणी करत आपल्या कोट्यातून परभणीची जागा दिली. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची या ठिकाणी सभा झाली होती. मात्र त्यांच्या सभेचीही जादू फिकी पडल्याचे दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कल्याणच्या बिर्ला कॉलेज रोडवर नशेखोरांची दहशत

कारला धडक दिल्याने अभिनेत्रीची सटकली, फटाके फेकत भररस्त्यात राडा; म्हणाली- 'माझी दिवाळी...', VIDEO व्हायरल

सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर घसरले! १० तोळ्यांवर किती हजाराची बचत? भाऊबीजेला घ्या नवा दागिना

Early signs of brain cancer: सततची डोकेदुखी होत असेल तर असू शकतो ब्रेन कॅन्सर; मेंदू देत असलेले संकेत ओळखा

Sonalee Kulkarni: हॉट अन् बोल्ड सोनाली कुलकर्णी, लेटेस्ट फोटोंनी उडवली झोप

SCROLL FOR NEXT