Belly fat loss: पोटाची चरबी कमी होईल? रोजच्या रुटीनमध्ये करा 'हे' बदल

Surabhi Jayashree Jagdish

सकाळी ३० मिनिटं व्यायाम करा

बेली फॅट कमी करण्याच्या प्रयत्नात सकाळी सुमारे ३० मिनिटं व्यायाम करणं हा दैनंदिन शारीरिक हालचाली वाढवण्याचा सोपा मार्ग आहे. चालणं, वेगाने चालणे, सायकलिंग किंवा इतर एरोबिक व्यायाम यामध्ये करता येतात.

reduce belly fat naturally | saam tv

कॅलरी खर्च होण्यास मदत

व्यायाम करताना शरीराला ऊर्जा लागते आणि त्यामुळे कॅलरी खर्च होतात. नियमित शारीरिक हालचाली आहारातून मिळणाऱ्या ऊर्जेचा वापर वाढवण्यास मदत करतात. वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत व्यायामासोबत आहारातील एकूण कॅलरीचे प्रमाणही महत्त्वाचे असते.

exercise for weight loss | saam tv

प्रोटीनयुक्त पदार्थ

वजन कमी करण्याच्या प्रयत्नात डाळी, कडधान्ये, अंडी, दूध-दही, पनीर, मासे किंवा चिकन यांसारखे प्रोटीनयुक्त पदार्थ आहारात घेता येतात. प्रोटीनमुळे जेवल्यानंतर पोट भरल्याची भावना अधिक काळ टिकण्यास मदत होऊ शकते.

cycling for weight loss | saam tv

साखरयुक्त ड्रिंक कमी करा

अतिरिक्त साखर असलेल्या कोल्ड्रिंकमधून आणि इतर गोड पेयांमधून मोठ्या प्रमाणात अतिरिक्त कॅलरी मिळू शकतात. अशा पेयांचं नियमित किंवा जास्त प्रमाणातील सेवन वजन वाढण्याशी संबंधित असू शकतं.

aerobic exercise for weight loss | saam tv

लिफ्टऐवजी जिन्यांचा वापर करा

ऑफिसमध्ये किंवा इतर ठिकाणी शक्य असेल तेव्हा लिफ्टऐवजी जिन्यांचा वापर करा. जिने चढताना पायांच्या स्नायूंचा वापर होतो आणि शरीराला अधिक ऊर्जा खर्च करावी लागते. दररोजच्या छोट्या-छोट्या हालचाली वाढवल्याने एकूण शारीरिक सक्रियता वाढवण्यास मदत होते.

sugary drinks and weight gain | saam tv

काही ड्रिंक्सचं सेवन कमी करा

पोटाचा घेर कमी करण्याच्या प्रयत्नात कोणती पेयं नियमितपणे घेतली जातात याकडेही लक्ष देणं गरजेचं आहे. जास्त साखर आणि कॅलरी असलेल्या पेयांचं प्रमाण कमी केल्यास अनावश्यक कॅलरीचं सेवन कमी करता येतं.

daily physical activity | saam tv

व्यायाम आणि आहार

वरील उपायांचा फायदा मिळवण्यासाठी ते नियमितपणे दैनंदिन जीवनशैलीचा भाग बनवणं महत्त्वाचं आहे. केवळ एखाद्या दिवशी व्यायाम करण्याऐवजी आठवडाभर सातत्याने शारीरिक हालचाल ठेवण्याचा प्रयत्न करा.

increase daily movement | saam tv

टीप

ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Cinnamon water: सकाळी सकाळी एक ग्लास प्या दालचिनीचं पाणी, मिळतील जबरदस्त फायदे

येथे क्लिक करा