Satej Patil on Sangli Lok Sabha Constituency Saam Tv
लोकसभा २०२४

Sangli Lok Sabha: सांगलीत ठाकरे गट-काँग्रेस आमनेसामने? सतेज पाटील यांनी उद्धव ठाकरेंचं यांचं नाव घेत केलं मोठं वक्तव्य

Lok Sabha Election 2024: उद्धव ठाकरे यांनी सांगली लोकसभा मतदारसंघासाठी आपला उमेदवार जाहीर केला आहे. असं असलं तरी यावरून ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात एकमत झालं नसल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

>> रणजीत माजगावकर

Satej Patil on Sangli Lok Sabha Constituency:

उद्धव ठाकरे यांनी सांगली लोकसभा मतदारसंघासाठी आपला उमेदवार जाहीर केला आहे. असं असलं तरी यावरून ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात एकमत झालं नसल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे. यातच काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी याबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

ते म्हणाले आहेत की, ''सांगली पारंपरिक पद्धतीने आम्हाला मिळावी, ही आमची इच्छा होती. कोल्हापूरच्या बदल्यात सांगली असा, कोणता विषय नव्हता. सांगलीत विशाल पाटील उभे राहीले तर ते निवडून येतील. उद्धव ठाकरे यांनी उमेदवार घोषित करणं, हा त्यांचा निर्णय आहे. पण अजून आम्हाला याबाबत सकारात्मक काही घडेल असं वाटतं.'' ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शाहू महाराज यांच्या उमेदवारीवर बोलताना सतेज पाटील म्हणाले आहे की, ''शाहू महाराज यांच्या माध्यमातून सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा विचार संसदेत जाणार आहे. या सगळ्याचा आम्हाला आणि कोल्हापूरकरांना आनंद आहे. आज विशिष्ट परिस्थिती निर्माण झाल्यानंतर 25 वर्षांनी काँग्रेस चिन्हासमोरील बटन दाबायला मिळणार आहे. प्रकाश आंबेडकर यांनी शाहू महाराज यांच्याबद्दल घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करतो. डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी शाहू महाराज यांचे ऋणानुबंध पाहायला मिळाले.'' (Latest Marathi News)

राजू शेट्टी यांच्या उमेदवारीबद्दल बोलताना ते म्हणाले, ''राजू शेट्टी यांच्याबाबत पुढच्या दोन दिवसात निर्णय होईल. हातकणंगलेची जागा ही शिवसेनेची आहे. पण आम्हाला वाटतं की राजू शेट्टी यांनी आमच्यासोबत लढावं. महायुतीच्या खासदाराला पराभूत करणं हे महाविकास आघाडीचा अजेंडा असेल. आमच्या विचाराचा खासदार दिल्लीत जावा, अशी आमची भूमिका आहे.''

उदयनराजे भोसले आणि अमित शाह यांच्या भेटीबद्दल बोलताना ते म्हणाले, ''आज उदयनराजे यांना दिल्लीत जाऊन तीन दिवस भेट मिळत नाही. त्यामुळे उदयनराजे यांच्याबद्दल कुणाला आदर आहे, हे समोर आलंय. उदयनराजे यांची गरज होती, त्यावेळी घरात येऊन सन्मान केला होता. मग आता भाजपला उदयनराजे यांची भाजपला गरज आहे की, नाही मला माहित नाही. पण दिल्लीत तीन दिवस जाऊन सुद्धा उदयनराजे यांना भेट दिली जात नाही.''

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

65 वर्षे जुना कायदा बदलण्याच्या तयारीत मोदी सरकार, खासदार अपात्रता कायद्याच्या जागी नवीन कायदा आणण्याची केंद्राची योजना

Maharashtra News Live Updates: पुणे शहरासह जिल्ह्यात आज अनेक नेत्यांच्या सभा

Shani Margi 2024: शनी देव कुंभ राशीत मार्गस्थ; 'या' राशींसमोर संकटं येणार, आर्थिक घडी विस्कटणार

Ayushman Bharat Yojana: ५ लाखांपर्यंत मोफत उपचार, कोणत्या हॉस्पिटलमध्ये घेता येणार उपचार; पाहा लिस्ट

Sharad Pawar vs Ajit Pawar : साहेब की दादा, बारामतीमध्ये आज कुणाचा आव्वाज घुमणार?

SCROLL FOR NEXT