nilesh rane criticises vinayak raut and vaibhav naik ratnagiri sindhudurg lok sabha election Saam Digital
लोकसभा २०२४

कोकणच्या मुंगेरीलालचा पराभव अटळ, माेठ्या सुट्टीवर जाणार; राणेंचा राऊतांवर प्रहार, VIDEO

ratnagiri sindhudurg lok sabha election : विनायक राऊत जिंकले तर कोकणाचं नुकसान आहे आणि नारायण राणे जिंकले तर कोकणाचा फायदा आहे. त्यामुळे कोकणी माणूस यावेळी व्यवहारी राहून फायद्याचे गणित करेल असे माजी आमदार प्रमोद जठार यांनी नमूद केले.

अमोल कलये

Ratnagiri Sindhudurg Constituency :

रत्नागिरी सिंधुदूर्ग मतदारसंघात विराेधकांची तंतरली आहे. नारायण राणेंचा (mp narayan rane) विराेधक इतकीच विनायक राऊत (mp vinayak raut) यांचा महाराष्ट्रात परिचय. राणेंवर टीका करणे एवढेच त्यांचे काम आहे. वैभव नाईक यांना ठाकरेंनी कधी बाकावर पण बसवलं नाही, त्यांना ऑक्टोंबरमध्ये मी घरी बसवणार असे प्रत्युत्तर माजी खासदार निलेश राणे (nilesh rane) यांनी आमदार वैभव नाईक (mla (vaibhav naik) यांच्यासह विराेधकांना दिले. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

रत्नागिरी सिंधुदूर्ग मतदारसंघात आज रत्नागिरी येथे महायुतीचे भाजपचे उमेदवार नारायण राणे यांची लाेकसभा निवडणुकीसाठीचा अर्ज भरण्यासाठी रॅली निघाली आहे. या रॅलीत गाेव्याचे मुख्यमंत्री डाॅ. प्रमाेद सावंत यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.

दरम्यान नारायण राणेंच्या उमेदवारीची पात्रता ठरवण्यासाठी भाजपला एवढा वेळ लागला. वर्गात पहिल्या बाकावर बसणाऱ्या विद्यार्थ्याला शेवटच्या बाकावर बसवलं. तेराव्या यादीत राणेंची उमेदवारी घोषित केली अशी टीका ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी राणेंवर केली हाेती. त्यास आज निलेश राणेंनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले वैभव नाईक यांना उद्धव ठाकरेंनी कधी बाकावर पण बसवलं नाही. त्यांना ऑक्टोंबर मध्ये मी घरी बसवणार. विनायक राऊतांचा या निवडणुकीत पराभव हाेणार असा विश्वास राणेंनी व्यक्त केला.

नारायण राणेंना मोदींच्या मंत्रीमंडळात हेवी वेट मंत्रीपद मिळेल : प्रमोद जठार

माजी आमदार प्रमोद जठार म्हणाले विनायक राऊत जिंकले तर कोकणाचं नुकसान आहे आणि नारायण राणे जिंकले तर कोकणाचा फायदा आहे. त्यामुळे कोकणी माणूस यावेळी व्यवहारी राहून फायद्याचे गणित करेल. कोकणाला आता विकासाची आणि रोजगाराची गरज आहे. त्यामुळे राहूल गांधी पंतप्रधान होत नाहीत आणि विनायक राऊत जिंकून काय मंत्रीपद मिळणार नाही. त्यामुळेच नारायण राणेंना मोदींच्या मंत्रीमंडळात हेवी वेट मंत्रीपद मिळेल असा दावा माजी प्रमोद जठार यांनी केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: साकोलीचं महाभारत ! जातीय समीकरण कुणाच्या पथ्यावर? पटोलेंपुढे अविनाश ब्राह्मणकरांचं आव्हान

Horoscope Today : काहींना नको असलेल्या गोष्टींचा होईल त्रास, तर कोणाचे शत्रू काढतील डोके वर, वाचा तुमचे आजचे राशिभविष्य

Horoscope: कुंभ राशीचं करिअर, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने कसा असेल आजचा दिवस; वाचा आजचे राशीभविष्य

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

SCROLL FOR NEXT