Pm Modi And Nitish Kumar Saam Tv
लोकसभा २०२४

Lok Sabha Election 2024: बिहारमध्ये भाजपच मोठा भाऊ! BJP 17 जागांवर लढवणार निवडणूक, JDU ला किती जागा मिळाल्या?

Pramod Subhash Jagtap

NDA Seat Sharing In Bihar:

लोकसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर एनडीएने बिहारमध्ये जागावाटपाची घोषणा केली आहे. बिहारमध्ये लोकसभेच्या 40 जागा आहेत. यात भाजप 17 तर नितीश कुमार यांचा पक्ष जेडीयू 16 जागांवर निवडणूक लढवणार आहे, अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी दिली आहे. यासोबतच चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीला (रामविलास) 5 जागा दिल्या जाणार आहेत, अशी माहिती तावडे यांनी दिली.

यासोबतच जीतन राम मांझी यांच्या पक्ष हमला 1 जागा आणि उपेंद्र कुशवाहा यांचा पक्ष आरएलएमओला 1 जागा देण्यात आली आहे. तावडे यांनी आज पत्रकार परिषद घेत ही माहिती जाहीर केली आहे. यावेळी भाजप बिहारचे प्रदेशाध्यक्ष सम्राट चौधरी, जेडीयू नेते संजय झा आणि इतर पक्षांचे नेतेही उपस्थित होते.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भाजप कोणत्या जागांवर लढवणार निवडणूक?

विनोद तावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप बिहारमध्ये पश्चिम चंपारण, पूर्व चंपारण, औरंगाबाद, मधुबनी, अररिया, दरभंगा, मुझफ्फरपूर, महाराजगंज, सारण, उजियारपूर, बेगुसराय, नवादा, पटना साहिब, पाटलीपुत्र, आराह, बक्सर आणि सासाराम या लोकसभा मतदारसंघात आपले उमेदवार उभे करणार आहे.  (Latest Marathi News)

तसेच नितीश कुमार यांचा पक्ष जेडीयू वाल्मिकी नगर, सीतामढी, झांझारपूर, सुपौल, किशनगंज, कटिहार, पूर्णिया, मधेपुरा, गोपालगंज, सिवान, भागलपूर, बांका, मुंगेर, नालंदा, जेहानाबाद आणि शेओहर या 16 जागांवर आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार आहे.

बिहारमधील हाजीपूर, वैशाली, खगरिया, समस्तीपूर आणि जमुई या 5 लोकसभेच्या जागा चिराग पासवान यांच्या एलजेपी-रामविलास लढवणार आहेत. जीतन राम मांझी यांच्या पक्ष हम गया येथून आणि उपेंद्र कुशवाहा यांचा पक्ष आरएलएमओ काराकाट येथे आपला उमेदवार उतरवणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: 'महाराष्ट्रात काँग्रेसचा मुख्यमंत्री...' बाळासाहेब थोरातांनी सांगितली 'मन की बात'; राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या

BARC Recruitment: भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; पात्रता काय? अर्ज कसा कराल?

Soan Papdi Recipe : जिभेवर ठेवताच विरघळेल अशी सोनपापडी; घरच्याघरी कशी बनवायची

Maharashtra News Live Updates: महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांचा वेगवान आढावा

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT