ncp and bjp demands to contest satara constituency udayanraje bhosale lok sabha election 2024  Saam Tv
लोकसभा २०२४

Satara Constituency: उदयनराजेंसाठी अजित पवार गट सातारा मतदारसंघ साेडण्यास तयार नाही, जाणून घ्या कारण (Video)

Lok Sabha Election 2024 : ⁠नाशिकच्या जागेवर भाजपने हात झटकले⁠ असे समजते. त्यामुळे अजित पवार गटाची कोंडी झाली आहे. राज्यात आत्तापर्यंत अजित पवार गटाला अवघ्या चार जागा⁠ मिळाल्या आहेत.

Siddharth Latkar

- नितीन पाटणकर

Mahayuti :

एकीकडे सातारा लाेकसभा मतदारसंघात (satara lok sabha constituency) उमेदवारी जाहीर हाेण्यापूर्वीच भाजप नेते राज्यसभा खासदार उदयनराजे भाेसले (udayanraje bhosale latest marathi news) यांनी महायुतीचा (mahayuti) मीच उमेदवार असणार असा विश्वास व्यक्त करत मतदारसंघात झंझावती दाैरे सुरु केले आहेत. दूसरीकडे आजही राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार (nationalist congress party ajit pawar faction) गट हा सातारा मतदारसंघ राष्ट्रवादीच लढणार यासाठी आग्रही राहिली आहे. यामुळे साता-याची उमेदवारी नेमकी काेणत्या पक्षाकडे जाणार याची उत्सुकता नागरिकांना लागली आहे. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

उपमुख्यमंत्री अजित पवार हे सातत्याने सातारा लाेकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काॅंग्रेसचा दावा करीत आहेत. गेले दाेन महिने अजित पवार हे साता-याची जागा साेडण्यास तयार नाहीत. त्यातच सातारा मतदारसंघ भाजपला हवा आहे. खासदार उदयनराजे भाेसले यांच्यासाठी भाजप या मतदारसंघाची मागणी करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

साताऱ्याच्या बदल्यात नाशिकची जागा अजित पवार गटाला⁠ हवी आहे मात्र, नाशिकचा निर्णय शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार गटाने घ्यावा भाजपचे म्हणणे आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

⁠नाशिकच्या जागेवर भाजपने हात झटकले⁠ असे समजते. त्यामुळे अजित पवार गटाची कोंडी झाली आहे. राज्यात आत्तापर्यंत अजित पवार गटाला अवघ्या चार जागा⁠ मिळाल्या आहेत. ⁠त्यातही दोन जागांवरती आयात उमेदवार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

यामध्ये परभणी आणि शिरूरचा समावेश आहे. दरम्यान साताऱ्याच्या जागेबाबत अजित पवार गट आजही आग्रही राहिल्याने जागा वाटपाचा तिढा वाढल्याचे चित्र आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supplements: 'हे' सप्लीमेंट्स चुकूनही एकत्र घेऊ नका नाहीतर, आरोग्यावर होईल परिणाम

Maharashtra Politics : काँग्रेसला मोठा झटका, नाना पटोले यांचे निकटवर्तीय भाजपात जाणार

Ahilyanagar News: विद्यार्थी की मजूर? शाळा मग्रुर; मुलांना ट्रक खाली करायला लावला, सामच्या बातमीच्या दणक्यानंतर होणार कारवाई

Nepal Protest : नेपाळ पेटलं, चटके भारताला? शेजाऱ्यानं वाढवलं देशाचं टेन्शन, VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंना धक्का बसणार? नाराज पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी केला फोन, Video

SCROLL FOR NEXT