Nashik Mahayuti Candidate Saam TV
लोकसभा २०२४

Nashik Lok Sabha: ठाणे-कल्याणचं ठरलं, आता नाशिकचं कधी? चंद्रशेखर बावनकुळेंनी भुजबळांसमोरच सांगितलं

Nashik Mahayuti Candidate: ठाणे आणि कल्याणचं ठरलं. आता नाशिकचा कधी सुटणार, असा प्रश्न पत्रकारांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारला.

Satish Daud

Nashik Lok Sabha Mahayuti Candidate

महायुतीच्या जागावाटपाचा तिढा आता जवळपास सुटला आहे. ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. ठाण्यातून नरेश मस्के आणि कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय. दरम्यान, ठाणे आणि कल्याणचं ठरलं. आता नाशिकचा कधी सुटणार, असा प्रश्न पत्रकारांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारला.

यावर उत्तर देताना बावनकुळेंनी छगन भुजबळ यांच्यासमोरच उत्तर दिलं आहे. नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो उमेदवार देतील, त्या उमेदवाराला आमचा पाठिंबा असेल. तसेच त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी देखील आम्ही घेऊ. यासाठी तिन्ही पक्ष एकत्रितपणे मिळून काम करू, असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे. ते नाशिकात बोलत होते.

चंद्रशेखर बावनकुळे हे नाशिक दौऱ्यावर असून नाशिकच्या जागेवरून त्यांनी आज गिरीश महाजनांची भेट घेतली. यानंतर त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यासोबत देखील सविस्तरपणे चर्चा केली. या भेटीनंतर दोघांनीही पत्रकार परिषद घेत नाशिकचा तिढा लवकरच सुटणार असं सांगितलं.

मंत्री छगन भुजबळ यांची या मतदारसंघात मोठी ताकद असून ते सहकार्य करण्यास तयार असल्याचं बावनकुळे म्हणाले. शिवसेना उमेदवाराचा निर्णय शिंदेंनी घ्यायचा आहे. इथे निवडणुकीसाठी १८ दिवस बाकी आहेत. महायुतीचं मोठं जाळं असल्याने नाशिकची जागा आमच्या हातातून जाणार नाही, असंही बावनकुळे म्हणाले.

नाशिकमध्ये भाजपचे ३, राष्ट्रवादीचे २ आणि काँग्रेस पक्षाचा १ आमदार आहे. मात्र, या निवडणुकीत जनतेला मोदींना मतं द्यायची आहे. त्यामुळे नाशिकमधून महायुतीने कुणालाही उमेदवार दिला तरी लोक मोदींना मतं देतील. पालघरची जागा भाजपची, भाजप त्या ठिकाणी उमेदवार देईल, असंही बावनकुळे यांनी स्पष्ट केलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा अन् फक्त व्याजातून दर महिन्याला मिळवा ५५०० रुपये

Maharashtra Live News Update: अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे आज नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Maharashtra Rain: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, कोकणासह घाटमाथ्यावर तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

SCROLL FOR NEXT