Maharashtra Election 2024: कल्याण, ठाण्याचा सस्पेन्स संपला; महायुतीकडून दोन्ही उमेदवारांची घोषणा

Mahayuti's Kalyan, Thane Lok Sabha Candidates Declared: महायुतीच्या जागावाटपाचा तिढा अखेर सुटला असून कल्याण आणि ठाणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे.
Mahayuti Lok Sabha Candidates For Kalyan and Thane Lok Sabha Constituency is Declared
Mahayuti Lok Sabha Candidates For Kalyan and Thane Lok Sabha Constituency is DeclaredSaam TV

महायुतीच्या जागावाटपाचा तिढा अखेर सुटला असून कल्याण आणि ठाणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. ठाण्यातून एकनाथ शिंदे यांचे विश्वासू शिलेदार नरेश म्हके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर कल्याणमधून विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. शिवसेनेच्या अधिकृत कार्यालयातून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.

Mahayuti Lok Sabha Candidates For Kalyan and Thane Lok Sabha Constituency is Declared
Nashik Lok Sabha: महायुतीचं अखेर ठरलं! नाशिकमधून 'या' नेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब? आज होणार घोषणा!

"लोकसभा निवडणुकीसाठी कल्याण मतदारसंघातून श्रीकांत शिंदे आणि ठाणे मतदारसंघातून नरेश म्हस्के यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा", अशी एक्स पोस्ट शिवसेनेने आपल्या अधिकृत अकाउंटवरून केली आहे.

मंगळवारीच (ता.३०) महायुतीकडून उत्तर पश्चिम मुंबई आणि दक्षिण मुंबईचे उमेदवार जाहीर करण्यात आले होते. आज महाराष्ट्र दिनी शिवसेना शिंदे गटाने (Eknath Shinde) कल्याण आणि ठाण्याचे उमेदवार जाहीर केले आहेत. उत्तर पश्चिम मुंबई, दक्षिण मुंबईप्रमाणे ठाणे, कल्याणची जागा सुद्धा शिंदे गटाने आपल्याकडे राखली आहे.

ठाण्यात राजन विचारे विरुद्ध नरेश मस्के

ठाणे लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा गड मानला जातो. मात्र, शिवसेनेत फूट पडल्यानंतर इथे दोन गट पडले आहेत. ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) ठाण्यातून विद्यमान खासदार राजन विचारे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात आता शिंदे गटाने नरेश मस्के यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे.

नरेश म्हस्के हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात. दोन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून नरेश म्हस्के एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. त्यांना उमेदवारी दिल्यामुळे आता ठाण्यात मस्के विरुद्ध विचारे अशी काटे की टक्कर पाहायला मिळणार आहे.

कल्याणमधून श्रीकांत शिंदेंना उमेदवारी जाहीर

कल्याण लोकसभा मतदारसंघातून श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अगदी काहीच दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी कल्याणमधून श्रीकांत शिंदे हे महायुतीचे उमेदवार असणार, असं म्हटलं होतं. आज त्यांच्या नावाची अधिकृतपणे घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे कल्याणमध्ये महाविकास आघाडीच्या वैशाली दरेकर विरुद्ध श्रीकांत शिंदे अशी लढत होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com