Hemant Godse meet chief minister Eknath shinde  saam Tv
लोकसभा २०२४

Nashik Loksabha: हेमंत गोडसेंसाठी CM शिंदे मैदानात! मध्यरात्री मोठी खलबतं; मुख्यमंत्र्यांकडून नाराजांच्या मनधरणीचे प्रयत्न

Nashik Loksabha News: नाशिक लोकसभेसाठी मोठ्या नाट्यमय घडामोडीनंतर हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीची घोषणा झाली. मात्र उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही अद्याप महायुतीमध्ये नाराजीनाट्य सुरूच आहे.

Gangappa Pujari

तबरेज शेख, नाशिक|ता. १३ मे २०२४

नाशिक लोकसभेसाठी मोठ्या नाट्यमय घडामोडीनंतर हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीची घोषणा झाली. मात्र उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही अद्याप महायुतीमध्ये नाराजीनाट्य सुरूच आहे. हेमंत गोडसे यांच्या प्रचाराकडे अनेक महायुतीच्या नेत्यांनी पाठ फिरवल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता नाराजांची मनधरणी करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मैदानात उतरलेत.

नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उद्योगमंत्र्यांनी विविध क्षेत्रातील मान्यवरांची चर्चा केली. त्यानंतर रात्री 10 वाजता मनोहर गार्डन हॉटेलमध्ये जवळपास 2 ते 2 :30 तास युतीतील नाराज असलेल्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांशी हॉटेलच्या रूममध्ये वन टू वन चर्चा करून स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनधरणी करण्याचे प्रयत्न केले.

यावेळी सामंत यांना आजच्या घडामोडींमध्ये भुजबळ यांचा सहभाग नसल्याचे विचारले असता भुजबळ हे एक दिलाने प्रचारात सहभागी झाले आहेत, त्यांच्याविषयी आमच्या मनात आदर आहे. आजच्या बैठकांचा विषय वेगळा असल्याने भुजबळ या बैठकांना उपस्थित नव्हते मात्र भुजबळ हे प्रचारात उतरले आहेत आणि महायुतीच्या उमेदवाराच्या विजयासाठी प्रयत्नशील आहे असे सामंत यांनी स्पष्ट केले.

भाजपचे नेते आणि नाशिक लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक दिनकर पाटील हे भेटण्यासाठी आले नाही असे समजताच शिंदे स्वतः हॉटेलहून रात्री साडे बारा वाजता पाटील यांच्या घरी पोहोचले. मुख्यमंंत्री शिंंदेंनी दिनकर पाटील यांच्या निवासस्थानी सुमारे अर्धा तास बंद दाराआड चर्चा केली. या चर्चेनंतर पाटील यांची नाराजी दूर झाली. मात्र पाटील यांना गोडसेंसाठी मत मागणार का? असा प्रश्न विचारला असता त्यांनी महायुतीसाठी मत मागणार असल्याचे सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! दर महिन्याला मिळणार ९००० रुपये; कसं? जाणून घ्या

Success Story: IIT मुंबईमधून शिक्षण, लाखोंची नोकरी नाकारली, अवघ्या २२ व्या वर्षी UPSC क्रॅक ;IAS सिमी करण यांची सक्सेस स्टोरी

Shukra Gochar 2024: नोव्हेंबर अखेरीस शुक्राचं नक्षत्र गोचर वाढवणार डोकेदुखी; आर्थिक हानी होण्याचा धोका

Air Pollution : राजधानीची हवा अत्यंत विषारी! शाळा बंद, वाहनांना बंदी, दिल्लीमध्ये अनेक निर्बंध

Weather Update : थंडीची चाहूल, कमाल अन् किमान तापमानात घट

SCROLL FOR NEXT