Chhagan Bhujbal Saam Tv
लोकसभा २०२४

Breaking News : छगन भुजबळांची माघार, नाशिकमधून हेमंत गोडसेंची उमेदवारी निश्चित; 'साम'च्या बातमीवर शिक्कामोर्तब

Chhagan Bhujbal: छगन भुजबळ यांनी आज मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेत ही मोठी घोषणा केली आहे. यावेळी त्यांनी 'पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी माझ्यावर विश्वास टाकला त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.' असे सांगितले.

Priya More

नाशिक लोकसभा निवडणुकीतून (Nashik Loksabha Election 2024) माघार घेत असल्याची मोठी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujabal) यांनी केली आहे. छगन भुजबळ यांनी आज मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली आहे. यावेळी त्यांनी 'पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी माझ्यावर विश्वास टाकला त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.' असे सांगितले.

नाशिक मतदारसंघात ज्यांनी मला पाठिंबा दिला त्यांचा मी मनापासून आभारी असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितले. अशातच नाशिक लोकसभा निवडणुकीतून छगन भुजबळ यांनी माघार घेतल्यामुळे हेमंत गोडसेंची उमेदवारी निश्चित झाली असून 'साम'च्या बातमीवर आता शिक्कामोर्तब झाला आहे.

छगन भुजबळ यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, 'नाशिक लोकसभेबाबत होळीच्या दिवशी अजित पवारांनी मला बोलावून घेतलं. दिल्लीत झालेल्या महायुतीच्या बैठकीत जागा वाटपाबाबत चर्चा झाली. नाशिकसाठी अजित पवार यांनी समीर भुजबळ यांचे नाव सांगितलं होतं. पण अमित शहा यांनीच छगन भुजबळ यांचे नाव घेतलं होतं. पण एकनाथ शिंदे यांनी हेमंत गोडसे खासदार असल्याचे सांगितलं. पण अमित शहांनी नाशिकसाठी भुजबळच उमेदवार असतील असंच सांगितलं होतं.'

छगन भुजबळ यांनी यावेळी नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ताबडतोब जाहीर करावा अशी मागणी केली. त्यांनी सांगितले की, 'अजित पवारांशी बोलून झाल्यावर मी नाशिकमध्ये जाऊन आढावा घेतला आणि कामाला लागलो. आता जागा आणि उमेदवार जाहीर करण्याबाबत उशीर होत आहे. दिल्लीतील बैठकीबाबत मी शहानिशा करण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा केली होती. त्यामुळे चर्चेनुसार जागा जाहीर व्हायला हवी होती. आता ३ आठवडे पूर्ण झालेत. महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर झालाय. त्यांनी प्रचाराला देखील सुरुवात केली आहे. त्यामुळे या मतदार संघात कोण लढवणार?, कोण उमेदवार आहे? हे ताबडतोब जाहीर करावे. नाहीतर अडचण निर्माण होईल. कारण समोरचा पक्ष जोरदार कमाला लागला आहे.', असे त्यांनी सांगितले.

तसंच, 'जेवढा उशीर होईल तेवढा नाशिकच्या जागेचे नुकसान होऊ शकते त्यामुळे लवकर निर्णय घ्यावा ही अपेक्षा आहे. मी पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी माझ्या नावाचा आग्रह धरला त्यासाठी त्यांचा आभारी आहे. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचाराला गेलो. पुढे काही जणांनी माझा वेळ मागितला आहे. त्यामुळे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मी काम करणार आहे.' असे छगन भुजबळ यांनी स्पष्टपणे सांगितले. दरम्यान, छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभा निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे आता नाशिकमधून महायुतीकडून हेमंत गोडसे निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandrashekhar Bawnkule: राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घाला म्हणणारे राष्ट्रद्रोही; बावनकुळे यांची खोचक टीका

Kalyan News: कल्याणमध्ये 4 धाडसी तरूणांमुळे मोठा अनर्थ टळला, ऐन दिवाळीत आलं होतं मोठं संकट

Maharashtra Live News Update: पुणे शहराच्या उपनगरात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस

Winter Survival: ब्लॅंकेट, चादर नसताना पूर्वी लोक थंडीपासून कसे बचाव करायचे?

Maharashtra Politics: महाविकास आघाडीमध्ये बिघाडी? शरद पवार गट सोडणार काँग्रेसची साथ

SCROLL FOR NEXT