Lok Sabha Election 2024, Eknath Shinde, Ajit Pawar, Devendra Fadnavis Saam TV
लोकसभा २०२४

Nashik Loksabha: नाशिकच्या जागेवरून महायुतीत तिढा वाढला! भाजपकडून पुन्हा सर्वेक्षण; नव्या ३ नावांची चर्चा

Gangappa Pujari

तबरेज शेख, नाशिक|ता. ८ एप्रिल २०२४

Nashik Loksabha Constituency News:

नाशिक लोकसभेच्या जागेवरुन महायुतीत सुरू असलेला तिढा काही सुटत नसल्याची चिन्हे दिसत आहेत. नाशिकमधून पुन्हा उमेदवारी मिळवण्यावर शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे ठाम आहेत. तर नाशिकची जागा छगन भुजबळ यांना मिळणार असल्याचे बोलले जात आहे. अशातच आता नाशिकमध्ये महायुतीकडून नव्या नावांची चाचपणी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

नाशिकचा तिढा वाढला..

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नाशिक लोकसभेच्या जागेवरुन महायुतीत कलह सुरू आहे. नाशिकची जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला मिळणार असून छगन भुजबळ उमेदवार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र आता भाजपकडून नवा सर्व्हे करत तीन नव्या नावांची चाचपणी केल्याची माहिती समोर आली आहे.

नव्या नावांची चर्चा...

या नव्या नावांमध्ये भाजपचे (BJP) नाशिक पूर्व विधानसभेचे आमदार राहुल ढिकले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार माणिकराव कोकाटे आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांची नावे चर्चेत आहेत. संघ परिवाराकडून ही चाचपणी केली जात असल्याची माहिती आहे. या नावांमध्ये भाजप आणि संघाकडून राहुल ढिकले यांच्या नावाला पसंती दर्शवल्याचेही सांगण्यात येत आहे.

दरम्यान, नाशिक लोकसभेसाठी छगन भुजबळांना (Chhagan Bhujbal) होणारा विरोध पाहता संघाकडून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना उमेदवार बदलाबाबत तातडीचा संदेश पाठवल्याची माहितीही समोर आली आहे. त्यामुळे नाशिकच्या गुंता वाढत चालला असून गुढी पाडव्या नंतरच नाशिकच्या जागेवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. (Maharashtra Loksabha Election)

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT