Lok Sabha 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विदर्भात; चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचाराचं रणशिंग फुंकणार

PM Modi Sabha In Chandrapur: आज पूर्व विदर्भात पहिल्या टप्यातील लोकसभा मतदारसंघात सभांचा धडाका सुरू होणार आहे. आज पंतप्रधान मोदी विदर्भात पहिली सभा घेणार आहेत.
PM Modi Sabha In Chandrapur
PM Modi Sabha In ChandrapurSaam Tv

पराग ढोबळे साम टीव्ही, नागपूर

Maharashtra Politics PM Modi Sabha

आज पूर्व विदर्भात पहिल्या टप्यातील लोकसभा (Maharashtra Politics) मतदारसंघात सभांचा धडाका सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांची आज चंद्रपूरमध्ये सभा आहे. तेथे ते विदर्भातील पहिली सभा घेणार आहे. राज्यात लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर चांगलीच रणधुमाळी पाहायला मिळत आहे. भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार (BJP Leader Sudhir Mungantiwar) यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सभा घेत आहेत.  (Maharashtra Lok sabha Election)

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेतून महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकले जाणार आहे. यूपीचे मुख्यमंत्री ही आदित्य योगीनाथ आज विदर्भात सभा घेणार आहेत. वर्धा लोकसभा मतदारसंघातील हिंगणघाटमध्ये (PM Modi Sabha In Chandrapur) भाजपचे उमेदवार तथा खासदार रामदास तडस यांच्या प्रचारार्थ सभा घेत असल्याची माहिती मिळत आहे. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्यानंतर भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील मेंढे यांच्या प्रचारार्थ सभा घेण्यात येणार आहे. सायंकाळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nagpur Lok Sabha Constituency) यांच्या प्रचारार्थ नागपुरात योगी आदित्यनाथ यांची सभा पार पडणार आहे. उमेदवारांच्या प्रचारासाठी या सभा घेणार येणार आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा घेत (Lok Sabha 2024) आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, (Lok Sabha Election) पंतप्रधान मोदी छत्तीसगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, तामिळनाडू आणि महाराष्ट्रात प्रचार करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रातील चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून जनतेला राज्याचे (Maharashtra Politics PM Modi Sabha) वन, संस्कृती आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना मतदान करण्याचं आवाहन करणार आहे.

PM Modi Sabha In Chandrapur
Maharashtra Politics 2024 : काँग्रेस-शिवसेनेत पुन्हा वादाची शक्यता; सांगलीनंतर मुंबईतही ठाकरे गट देणार काँग्रेसच्या जागेवर उमेदवार?

आज विदर्भात पंतप्रधान मोदींची पहिली सभा पार पडणार (PM Modi In Chandrapur) आहे. त्यामुळे त्यांच्या या सभेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. आता पंतप्रधान मोदी स्वत: प्रचाराच्या रिंगणात उतरल्याचं दिसत आहे. इतर सर्व पक्ष देखील आपापल्या उमेदवारांचा जोरदार प्रचार करत आहेत.

PM Modi Sabha In Chandrapur
Political News : महायुतीच्या मेळाव्याला भाजपच्या कोल्हेंची गैरहजेरी; विखेंसोबत एकाच मंचावर येण्याचे टाळले

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com