Marathwada Water Shortage: चिंता वाढली! मराठवाड्यातील ५१ तालुक्यात टँकरने पाणीपुरवठा, भूजल पातळीत मोठी घट

Chhatrapati Sambhaji Nagar Water Shortage: मराठवाड्यावर ५१ तालुक्यांवर गडद जल संकट आहे. मराठवाड्यात भूजल पातळीत घट झाली आहे. मराठवाड्यातील टँकरची संख्या एक हजारवर पोहोचली आहे.
  Water Shortage
Marathwada Water ShortageSaam Tv

रामनाथ ढाकणे साम टीव्ही, छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Water Crisis

राज्यात एकीकडे निवडणुकीची धामधूम सुरू आहे, तर दुसरीकडे मात्र सर्वसामान्य जनतेला पाणीटंचाईला तोंड द्यावं लागत आहे. पाण्यासाठी त्यांची मोठी वणवण सुरू आहे. काही ठिकाणी महिला मोठ्या प्रमाणात पाण्यासाठी भटकंती करताना दिसून (Marathwada Water Shortage) येत आहे. मराठवाड्यातील भूजल पातळीमध्ये दिवसेंदिवस घट होत चालली आहे.(Latest Marathi News)

जवळपास ५१ तालुक्यांवर भीषण जल संकट निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. विभागात सद्यस्थितीला टँकरची संख्या ही जवळपास एक हजारपर्यंत पोहचली आहे. पुढील १० दिवसांत हा आकडा (Water Crisis) अजून वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. उन्हाचा कडाका जास्त असल्यामुळे तापमान वाढ मोठ्या प्रमाणात होत आहे. याचा परिणाम भूजलावर देखील परिणाम होतोय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मराठवाड्यातील ७६ पैकी ५१ तालुक्यांत भूजल पातळीवर (Water Shortage) परिणाम झाला आहे. सर्वाधिक २.२८ मीटर भूजल पातळी परभणी, तर त्या खालोखाल २.१३ मीटर लातूर जिल्ह्यामध्ये घटली आहे. भूजल सर्वेक्षण विभागाने मराठवाड्यातील ८७५ विहिरींची पाणी पातळी तपासली आहे. दरम्यान महिनाभरानंतर ही परिस्थिती आणखी गंभीर होण्याची चिन्हे दिसत (Chhatrapati Sambhaji Nagar Water Crisis) आहे. आता मराठवाडा हा टँकर वाडा बनतो की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मराठवाड्यातील अनेक गावांमध्ये सध्या टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. पाणीप्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे, एप्रिल महिन्याच्या सुरूवातीलाच नागरिकांचे पाण्यासाठी मोठे हाल होत आहेत. मराठवाड्यात भूजल पातळीत (Chhatrapati Sambhaji Nagar News) कमालीची घट झाली आहे. छत्रपती संभाजीनगरवर देखील पाणी कपातीचे संकट असल्याचं दिसत आहे.

  Water Shortage
Beed Water Crisis: बीडच्या मनकर्णिका प्रकल्पात अवघा १५ टक्के पाणीसाठा शिल्लक; ४० गावांवर ओढावणार पाणी टंचाईचे संकट

शहरातील १६ वार्डांना पाणीपुरवठा करणाऱ्या हर्सूल तलावात फक्त ७ फूट पाणी शिल्लक राहिलं आहे. त्यामुळे आता उन्हाळ्यामध्ये काय हाल होणार, असा प्रश्न सर्वांना पडत आहे. तलावातील पाणी पातळी ७ फुटांवर येऊन (Sambhaji Nagar Water Shortage) ठेपली आहे. महिनाभर पुरेल एवढाच जलसाठा हर्सुल तलावात आहे. त्यामुळे मे महिन्यात मनपासमोर गंभीर प्रश्न निर्माण होणार आहेत.

  Water Shortage
Water Crisis: राज्यावर भीषण पाणीटंचाईचं संकट, धरणांमध्ये केवळ इतकाच पाणीसाठा; अनेक शहरांत पाणीकपातीला सुरुवात

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com