Jyoti Amage Saam Tv
लोकसभा २०२४

Nagpur Loksabha Election 2024: जगातील सर्वात कमी उंचीच्या महिलेने बजावला मतदानाचा हक्क

Jyoti Amage Cats Vote: गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नावाची नोंद झालेली ज्योतीने आपल्या कुटुंबीयांसोबत मतदानाचा हक्क बजावला. मतदान केल्यानंतर तिने नागरिकांनाही मतदान करण्याचे आवाहन केले. ज्योतीने जनतेला आवाहन करून मतदान करणे हे आपले कर्तव्य असल्याचं देखील सांगितलं.

Priya More

लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) पहिल्या टप्प्यासाठी आज २१ राज्यांतील १०२ मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली. यामध्ये महाराष्ट्रातील एकूण ५ मतदारसंघांचा समावेश होता. महाराष्ट्रातील नागपूरमध्ये आज लोकसभेसाठी मतदान पार पडले. जगातील सर्वात कमी उंचीची महिला ज्योती आमगेने नागपुरात मतदान केले. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नावाची नोंद झालेली ज्योतीने आपल्या कुटुंबीयांसोबत मतदानाचा हक्क बजावला. मतदान केल्यानंतर तिने नागरिकांनाही मतदान करण्याचे आवाहन केले. ज्योतीने जनतेला आवाहन करून मतदान करणे हे आपले कर्तव्य असल्याचं देखील सांगितलं.

मतदान करण्यासाठी ज्योती आमगे लाल रंगाच्या फ्रॉकमध्ये आली होती. मतदान करुन मतदान केंद्राबाहेर आल्यानंतर ज्योतीने आपल्या बोटावरील शाई दाखवत मीडियासमोर पोझ दिल्या. ज्योती किसनजी आमगेचा जन्म नागपूरमध्ये झाला. ज्योतीची उंची फक्त २ फूट आहे. तिचे वजन साडेपाच किलो इतकेच आहे. जगातील सर्वात कमी उंचीची महिला म्हणून तिची ओळख आहे. ज्योती आमगेच्या नावाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. तिने दोन वेळा विश्वविक्रम आपल्या नावावर केले आहेत.

ज्योती आमगेला ॲकॉन्ड्रोप्लासिया नावाचा आजार झाला आहे. त्यामुळे एका विशिष्ट उंचीच्या पुढे तिची उंची वाढली नाही. कमी उंचीमुळे ज्योतीला खूप चिडवले गेले. पणनंतर ज्योतीला कमी उंचीमुळे खूप प्रसिद्धी मिळाली. ज्योती नागपूरमध्ये आपले आई, वडील, भाऊ आणि वहिनीसोबत राहते. ज्योतीने एका मुलाखतीमध्ये तिला लग्न करायचे नाही नसून अविवाहित राहायचे असल्याचे सांगितले होते.

ज्योती आमगेच्या आधी ब्रिजेट जॉर्डनने जगातील सर्वात कमी उंचीच्या महिलेचा मान पटकावला होता. 2009 मध्ये ज्योतीला जगातील सर्वात कमी उंचीची महिला ही पदवी मिळाली होती. ज्योती बिग बॉस सीझन 6 मध्ये दिसली होती. त्यानंतर ज्योतीला लोकांचे खूप प्रेम मिळाले. यासोबतच ती अमेरिकेत बनलेल्या प्रसिद्ध हॉरर स्टोरी 'फ्रीक शो'मध्येही दिसली आहे. ज्योती सध्या अभिनय आणि मॉडेलिंग करते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs SA : कोलकाता कसोटी विजयासाठी भारताला १२४ धावांचे आव्हान, आफ्रिका बाजी पलटवणार का?

Mahesh Babu : हातात त्रिशूल घेऊन नंदी बैलावर स्वार; महेश बाबूचा 'रुद्र' अवतार, पाहा VIDEO

Pune : ना ठाम भूमिका, ना दिलेले काम पूर्ण! ठाकरेंची नाराजी दूर करण्यात मनसैनिक सपशेल फेल?

Maharashtra Live News Update: पुण्यातील मनसे नेते राज ठाकरेंची भेट घेणार

Shubman Gill: टीम इंडियाला मोठा धक्का! कोलकाता टेस्टमधून शुभमन गिल बाहेर; 'या' खेळाडूकडे कर्णधारपदाची धुरा

SCROLL FOR NEXT