कोल्ड्रिंक प्यायल्याने ११ वर्षीय मुलाची प्रकृती बिघडली; निरखून पाहिलं तर आढळला कचरा, प्रकरण थेट पोलिसांत पोहोचलं

mumbai crime news : मुंबईच्या विक्रोळीत कोल्ड्रिंक प्यायल्याने ११ वर्षीय मुलाची प्रकृती बिघडल्याची घटना घडली. त्यानंतर हे प्रकरण थेट पोलिसांत पोहोचलं आहे.
Mumbai news
mumbai crime news :Saam tv
Published On
Summary

विक्रोळीत कोल्ड्रिंक बॉक्समध्ये कचरा आढळला.

११ वर्षीय मुलाने पेय प्यायल्यानंतर त्याची प्रकृती बिघडली

पालक थेट पोलिसांत पोहोचले

मयूर राणे, साम टीव्ही

उन्हाळ्याची चाहुल लागल्याने लहान मुले कोल्ड्रिंक मोठ्या प्रमाणात पिऊ लागली आहेत. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची कोल्ड्रिंक बॉक्सला अधिक पसंती असते. राज्यातील विविध दुकानात अवघ्या १० ते १२ रुपयांमध्ये कोल्ड्रिंक बॉक्स उपलब्ध होतो. त्यामुळे शाळेत जाताना किंवा सुट्टीच्या दिवशी कोल्ड्रिंक बॉक्स खरेदीसाठी गर्दी पाहायला मिळते. याच कोल्ड्रिंक बॉक्समधील पेय प्यायल्याने एका मुलाची प्रकृती बिघडल्याचे समोर आलं आहे. देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

मुंबईच्या विक्रोळी टागोरनगर येथील रामभजन कंपाऊंडमधील महालक्ष्मी डेअरीमधून खरेदी केलेल्या कोल्ड्रिंक बॉक्समध्ये कचरा आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वीर काली या ११ वर्षांच्या मुलाने अर्धा पेय प्यायल्यानंतर त्याला त्रास जाणवू लागला.

Mumbai news
ज्येष्ठ छायाचित्रकार रजनीश काकडे यांचे निधन; अनेक पुरस्कारांचे ठरले होते मानकरी

पालकांनी बॉक्स तपासला असता त्यात कचरा आढळून आला. याबाबत दुकानदाराला विचारणा केली. परंतु दुकानदाराने उडवाउडवीची उत्तरे देण्यात आल्याचा आरोप आहे. संतप्त पालकांनी विक्रोळी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ संबंधित दुकानदाराला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पुढील तपास विक्रोळी पोलीस करत आहेत.

Mumbai news
दिवसाढवळ्या तरुणाची गोळ्या झाडून हत्या; गोळीबाराचा थरार CCTV कॅमेऱ्यात कैद, VIDEO

वीर कालीची आई संगिता यांनी सांगितलं की, आमच्या घराच्या बाजूला एक दुकान आहे. त्या दुकानातून कोल्ड्रिंक बॉक्स विकत घेतला होता. त्याने प्यायल्यानंतर चव वेगळी लागली. त्यानंतर बॉक्स तपासल्यानंतर त्यात कचरा आढळला. मी डेअरीवाल्याकडे गेली. त्यावेळी त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. आम्ही या प्रकरणात पोलिसांत धाव घेतली आहे. दोषींवर कारवाई व्हावी, अशी आमची मागणी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com