Sandipanrao Bhumre: छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन शिवसैनिक आमने-सामने, चंद्रकांत खैरे विरुद्ध संदीपान भुमरे यांच्यात लढत

Sandipan Bhumre Against Chandrakant Khaire: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संदीपान भुमरे यांच्या नावाचे नाव निश्चित केले आहे. भुमरे यांनी संभाजीनगरमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी तयारी देखील सुरू केली आहे.
chhatrapati sambhajinagar loksabha election 2024
Sandipan Bhumre Against Chandrakant KhaireSaam Tv
Published On

सूरज मसुरकर, मुंबई

छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन शिवसैनिकांमध्ये लढाई रंगणार आहे. ठाकरे गटाच्या चंद्रकांत खैरे यांच्याविरोधात शिंदे गटाचे संदीपान भुमरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिंदे गटाकडून संदीपान भुमरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. त्यामुळे संभाजीनगरमध्ये खैरे विरुद्ध भुमरे यांच्यामध्ये सामना रंगणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संदीपान भुमरे यांच्या नावाचे नाव निश्चित केले आहे. भुमरे यांनी संभाजीनगरमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी तयारी देखील सुरू केली आहे.

संदीपान भुमरे हे येत्या २५ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भुमरे आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदा अशी घटना घडत आहे की दोन शिवसैनिक एकमेकांसमोर उभे राहणार आहेत. संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरे विरुद्ध संदीपान भुमरे असा सामना येत्या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे.

chhatrapati sambhajinagar loksabha election 2024
Supriya Sule: 'मी नात्याचा आणि पदाचा सन्मान केला, पण...', सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली खंत

छत्रपती संभाजीनगरच्या लोकसभा निवडणुकीच्या अर्ज दाखल करण्याचा आजचा दुसरा दिवस असून एकूण सहा उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. यात बहुजन महा पार्टीच्या मनीषा खरात, हिंदुस्तान जनता पार्टीचे बबनगीर गोसावी, अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी दुसरा अर्ज तर खान एजाज अहमद, खाजा कसम शेख किस्मतवाला आणि सुरेश आसाराम फुलारे या तिघांनी देखील आपले अपक्ष उमेदवारी अर्ज भरले आहेत.

chhatrapati sambhajinagar loksabha election 2024
Sharad Pawar Speech: गुरुजी किती वय झालं? भर सभेत शरद पवारांनी ९४ वर्षांच्या कार्यकर्त्याला थेट नावासह ओळखलं| VIDEO

तर, संदिपान भुमरे, विलास भुमरे आणि विनोद पाटील हे उमेदवारी अर्ज घेऊन गेले आहेत. एकूण ८५ उमेदवारी अर्ज खरेदी केले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. आता शिवसेनेच्या शिंदे गटाकडून संदीपान भुमरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. उमेदवारी अर्ज घेऊन गेलेल संदीपान भुमरे हे २५ एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे.

chhatrapati sambhajinagar loksabha election 2024
Maharashtra Politics 2024 : वर्षा गायकवाड यांना उमेदवारी का दिली नाही? मिलिंद देवरा यांनी केला गौप्यस्फोट

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com