PM Modi In Wardha: काँग्रेस आणि इंडिया आघाडीची विचारसरणी विकासविरोधी, वर्ध्यात PM मोदींचा हल्लाबोल

Wardha Lok sabha: काँग्रेस आणि इंडिया आघाडीची विचारसरणी नेहमीच विकास विरोधी आणि शेतकरी विरोधी राहिली आहे : PM नरेंद्र मोदी
काँग्रेस आणि इंडिया आघाडीची विचारसरणी विकास विरोधी, वर्ध्यात PM मोदींचा हल्लाबोल
PM Modi In WardhaSaam Tv
Published On

PM Modi In Wardha:

''काँग्रेस आणि इंडिया आघाडीची विचारसरणी नेहमीच विकास विरोधी आणि शेतकरी विरोधी राहिली आहे. त्यामुळेच गेल्या अनेक दशकांपासून देशातील शेतकऱ्यांची स्थिती बिकट राहिली'', अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि इंडिया आघाडीवर केली आहे. वर्धा येथील सभेत ते असं म्हणाले आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीत केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ''देशात काहीच चांगलं काम होऊ शकत नाही, २०१४ आधी लोकांमध्ये अशी भावना निर्माण झाली होती. चोहीकडे निराशाचे वातावरण होते. गावांमध्ये लोकांना असं वाटत होत की, पाणी, रस्ते येऊ शकत नाही. गरिबांना वाटत होतं की, ते नेहमी गरीबच राहतील.''

काँग्रेस आणि इंडिया आघाडीची विचारसरणी विकास विरोधी, वर्ध्यात PM मोदींचा हल्लाबोल
Ajit Pawar: मोदी तिसऱ्यांदा सत्तेत आले तर 300 युनिट वीज मोफत मिळणार, अजित पवार यांचं मोठं वक्तव्य

ते म्हणाले, ''शेतकऱ्यांना वाटत होतं कितीही मेहनत केली तरी नशीब बदलणार नाही. महिलांना वाटत होतं, त्यांचं दुःख कधी कोणी समजू शकत नाही. मात्र ज्यांची कोणीच विचारपूस केली नाही, मात्र मी अनेक दशकांपासून प्रवाहातून बाहेर असलेल्या लोकांची काळजी घेतली.''

नरेंद्र मोदी म्हणाले, ''१० वर्षात आम्ही २५ कोणी लोकांना गरिबीतून बाहेर काढलं. आम्ही प्रत्येक गावात वीज पोहोचवली आहे. आम्ही देशातील ११ कोटी लोकांना पाणीचं कनेक्शन दिलं आहे. १० वर्षात ४ कोटी लोकांना पीएम आवास मिळालं आहे. १० वर्षात ५० कोटीहून अधिक लोक बँकेशी जुळून अर्थव्यवस्थाचा महत्त्वाचा घटक बनले आहेत.''

काँग्रेस आणि इंडिया आघाडीची विचारसरणी विकास विरोधी, वर्ध्यात PM मोदींचा हल्लाबोल
Sujitsingh Thakur: अजित पवारांचं भाषण सुरू असताना माजी आमदाराला आली भोवळ, उपचारासाठी रुग्णालयात दाखल

ते पुढे म्हणाले, ''2024 ची ही निवडणूक विकसित आणि आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करण्याची निवडणूक आहे. बापूंनी हे स्वप्न स्वातंत्र्यापूर्वीही पाहिले होते. त्यामुळे आज देश या दिशेने निर्णायक पावले टाकणार आहे, तेव्हा त्यासाठी वर्ध्याच्या विशेष आशीर्वादाची गरज आहे.'' यावेळी मोदी म्हणाले आहेत की, ''माझ्यासाठी गॅरंटी हा केवळ शब्द नाही. याचा अर्थ देशवासीयांसाठी माझे जीवन अर्पण करणे.''

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com