Nitin Gadkari VS Vikas Thakre Saam tv
लोकसभा २०२४

Nagpur Lok Sabha Constituency: नितीन गडकरी हॅट्रिक साधणार? की काँग्रेसचे विकास ठाकरे भाजपचा विजयी रथ रोखणार का? एक्झिट पोलचा अंदाज काय?

Maharashtra Election 2024 Result Battle: Nitin Gadkari VS Vikas Thakre: नागपूर लोकसभा मतदारसंघातील लढत लोकांमध्ये प्रतिष्ठेची मानली जात आहे. नागपुरात भाजपकडून नितीन गडकरी आणि काँग्रेसकडून विकास ठाकरे रिंगणात आहेत. या मतदारसंघात दुहेरी लढत दिसली. आता मतदारांना ४ जूनची उत्सुकता आहे.

Vishal Gangurde

नागपूर : लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया समाप्त झाली आहे. देशातील पहिल्या टप्प्यात नागपूर लोकसभा मतदारसंघाचाही समावेश होता. या मतदारसंघात भाजपकडून नितीन गडकरी आणि काँग्रेसकडून विकास ठाकरे रिंगणात होते. वंचित बहुजन आघाडीने या मतदारसंघात काँग्रेसला पाठिंबा दिला होता. त्यामुळे या मतदारसंघात दुहेरी सामना दिसला. यंदा नागपुरात ४७ टक्के मतदान झालं. आता ४ जूनला कोण निवडून येणार, याची उत्सुकता मतदारांना लागली आहे.

विदर्भातील नागपूर मतदारसंघातील निवडणूक सर्वात चर्चेची आणि प्रतिष्ठेची मानली जाते. या लोकसभा मतदारसंघात नितीन गडकरी तिसऱ्यांदा हॅट्रिक साधणार, असा अंदाज एक्झिट पोलने वर्तवला आहे. तर एक्झिट पोलमध्ये काँग्रेसचे विकास ठाकरे पिछाडीवर आहेत.

नागपूर लोकसभा मतदारसंघ कधीकाळी काँग्रेसचा गड मानला जात होता. मात्र, आता या मतदारसंघात काँग्रेसला अपयश येणार असल्याचे एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात येत आहे. टीव्ही ९ च्या पोलस्ट्रॅट पोलमध्ये नितीन गडकरी विजयी होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

नागपूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी, काँग्रेसचे नेत्यांची एकजूट आणि रिपाइं, वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमने उमेदवार दिला नव्हता. तर बहुजन समाज पक्षाने तगडा उमेदवार दिला नाही. ही बाजू काँग्रेसच्या उमेदवारासाठी सकारात्मक असल्याचा दावा अनेकांकडून करण्यात येत आहे. मात्र, तरीही बहुतेक एक्झिट पोलमध्ये भाजपचे नितीन गडकरी जिंकून येतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

नागपूरची जागा नितीन गडकरी यांनी २०१४ आणि २०१९ साली देखील जिंकली होती. यंदाही नितीन गडकरी जिंकल्यास ते हॅट्रिक करणारे दुसरे नेते ठरतील. याआधी नागपूर लोकसभा मतदारसंघातून विक्रम मुत्तेवार हे ४ वेळा विजयी होऊन संसदेत गेले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मला I-Phone हवाच' बायको हट्टाला पेटली, नवऱ्याला शिवीगाळ करत छतावरून ढकललं

Lalbaugcha Raja 2025: गुलाल अन् फुलांची उधळण; लालबागच्या राजाच्या निरोपाचा भावनिक क्षण

Red Chilli Benefits : लाल मिरचीचे गुप्त आरोग्यदायी गुण; जाणून घ्या निरोगी आरोग्याचं गुपित

Maharashtra Live News Update: नोएडा, उत्तर प्रदेशातील अनेक भागांत पावसाने लावली हजेरी

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

SCROLL FOR NEXT