मयूर राणे, साम टीव्ही मुंबई
ईशान्य मुंबईतील पवईत मतदान केंद्रावर घोळ सुरू असल्याचं दिसत आहे. यावरून आदेश बांदेकर भडकले आहेत. पवईतील हिरानंदानी मतदार केंद्रात मागील दोन तासांपासून लांबच लांब रांग लागल्याचं चित्र आहे. सिनेअभिनेते आणि शिवसेना सचिव आदेश बांदेकर देखील रांगेमध्ये उभे आहेत. या लांब रांगा लागण्यामागे नेमकं काय कारण आहे, हे अजून स्पष्ट झालेले नाही. परंतु सर्व मतदान खूप वेळापासून रांगेत उभे आहेत. अगदी जेष्ठ मतदार देखील या रांगांमध्ये उभे असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे.
पवई येथील पवई फाउंडेशन या मतदान केंद्रामधील काही बूथवर मतदान प्रक्रिया अतिशय धीम्या गतीने सुरू आहेत. नागरिक जवळपास पाच तासांपासून रांगेत उभे आहेत. आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. मतदान केंद्रावर सुरू असलेल्या या गोंधळामुळे त्यांनी निवडणूक आयोगावर ताशेरे (Mumbai Lok Sabha) ओढले आहेत. आदेश बांदेकर आणि त्यांचे कुटुंबीय देखील गेल्या काही तासांपासून या मतदान केंद्रामध्ये रांगेत उभे असल्याचं पाहायला मिळतंय.
आदेश बांदेकर यांनी सांगितलं की, ते आता पवई मतदान केंद्रावर (Powai Voting Booth) उभे आहेत. हिरानंदानी सारखा सुशिक्षीत एरिया आहे. येथे सगळ्या याद्या बंद आहेत. सगळ्या मशिनरी बंद आहेत. मतदान होण्यासाठी कोणत्याही मशिनरी काम करत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. अगदी तीन तीन तासांपासून लोकं रांगेत उभी आहेत. केंद्रावर कोणतीही मशिन सुरू नाही. नागरिकांमधून मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त होत आहे. पवईत मतदानाचा घोळ सुरू असल्याचं दिसत आहे.
पवईत मतदान केंद्रावर सिनेअभिनेते आदेश बांदेकर मागील काही तासांपासून कुटुंबासमवेत मतदानाच्या रांगेत उभे आहेत. परंतु तिथे कोणतेही मशिन काम करत नाहीये. बुथ क्रमाकं ५७ वर हा गोंधळ सुरू (Mumbai Lok Sabha Election 2024) आहे. तर संबंधित अधिकाऱ्यांसोबत कोणताही संपर्क होत नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी आलेले नागरिक उन्हातान्हात उभे आहेत. त्यांची मोठ्या प्रमाणावर चिडचिड होत असल्याचं दिसत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.