mp sanjay mandlik says he will win in kolhapur lok sabha constituency Saam Digital
लोकसभा २०२४

शाहू महाराज छत्रपतींना मोठी आघाडी, तरीही संजय मंडलिक विजयावर ठाम (पाहा व्हिडिओ)

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

काेल्हापूर लाेकसभा मतदारसंघात काॅंग्रेसचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांनी भाजपचे उमेदवार खासदार संजय मंडिलक यांच्या विराेधात पहिल्या फेरीत उत्तम मतांची आघाडी घेतली. ही आघाडी कायम ठेवत त्यांनी कार्यकर्त्यांचा उत्साह कायम ठेवला आहे. दरम्यान खासदार मंडलिक यांनी माध्यमांशी बाेलताना पहिल्या फेरीत मी पिछाडीवर असलाे तरी मतदारांनी माझ्यावर विश्वास ठेवला असून निश्चित पुढील काही फेरीत माझ्या मतांची आघाडी दिसेल असा विश्वास व्यक्त केला. दरम्यान पाचव्या 5 फेरी अखेर शाहू महाराज छत्रपतींनी 15000 मतांची मंडिलकांपेक्षा आघाडी घेतली आहे. (lok sabha nivadnuk nikal 2024)

आज सकाळी मतमाेजणी सुरु झाल्यानंतर शाहू महाराज छत्रपती यांनी पहिल्यापासून शेकडाे मतांची आघाडी घेतली. यामुळे खासदार संजय मंडलिक यांच्या गाेटात शांतता हाेती तर काॅंग्रेसचे कार्यकर्ते उत्साही दिसून येत हाेते.

संजय मंडिलक म्हणाले मतमाेजणीच्या एकूण 32 फे-या हाेणार आहेत. पहिल्या फेरीत मी पिछाडीवर असलाे तरी दुस-या फेरीत मला कागल, चंदगड या मतदारसंघातून माेठी आघाडी मिळेल असा विश्वास मंडिलक यांनी व्यक्त केला.

दरम्यान काेल्हापूर लाेकसभा मतदारसंघात 2 री फेरी अखेर शाहू महाराज छत्रपती यांनी एकूण 11118 मतांची आघाडी घेतली आहे. मात्र कागल येथून 1870 मतं त्यांनी खासदार संजय मंडिलक यांच्या पेक्षा कमी मिळाल्याचे चित्र आहे. पाचव्या 5 फेरी अखेर शाहू महाराज छत्रपतींनी 15000 मतांची मंडिलकांपेक्षा आघाडी घेतली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: कहरच..! भररस्त्यात प्रेमीयुगुलाने मारली मिठी, ट्रॅफिक फुल्ल जाम; लोक बघतच राहिली

Marathi News Live Updates : पंढरपूरजवळ धावत्या शिवशाही बसला आग, प्रवाशांची धावपळ

Crime News: थरारक... अजित पवार गटाच्या तालुकाध्यक्षाची निर्घृण हत्या, धारदार शस्त्रांनी वार करुन संपवलं

Budh Gochar 2024: 10 ऑक्टोबर रोजी बुध ग्रह करणार गोचर; अडचणी दूर होऊन 'या' राशींना मिळणार बक्कळ पैसा

IND vs NZ: आऊट असूनही अंपायरने नॉटआऊट दिलं; अंपायरच्या निर्णयावर Harmanpreet भडकली! नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT