नितीन पाटणकर साम टीव्ही, बारामती
बारामती लोकसभा मतदार संघात पोलीस बंदोबस्तात मतदारांना पैसे वाटप सुरु असल्याचा आरोप आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी केला आहे. रोहित पवारांनी एक्स या सोशल माध्यमांवर काही व्हीडीओ टाकत गंभीर आरोप केला आहे. भोर तालुक्यातील हे व्हिडीओ असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात मतदारांना पैसेवाटप सुरू असल्याचा खळबळजनक आरोप रोहित पवारांनी केलाय. त्यासंबंधी त्यांनी काही व्हिडिओ देखील शेअर केले आहेत.
हे पैसेवाटप करण्यामध्ये भोरमधील अजितदादा मित्रमंडळाचा पदाधिकारी आणि मावळ तालुक्यातील कार्यकर्ते असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. यासाठीच पाहीजे होती का वाय Y सुरक्षा? असा खोचक टोलाही रोहित पवार यांनी पार्थ पवार यांना लगावला आहे. रोहित पवार यांनी पैसे वाटपाचे व्हिडिओ त्यांच्या X अकाउंटवर शेअर (Money Distributed To Voters) केले आहे. यावेळी रोहित पवारांनी अजित पवारांवर टीका देखील केली आहे. रोहित पवारांच्या आरोपांना आता अजित पवार काय उत्तर देणार? याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे.
आज बारामती लोकसभा मतदारसंघात (Baramati Lok Sabha Constituency) मतदान पार पडत आहे. या मतदानाच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तीन हजार पोलीस बंदोबस्तात असल्याची माहिती मिळत आहे. आज बारामतीत सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होत आहे. आता बारामती लोकसभा मतदारसंघात विजयाची पताका कोण फडकवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
आज राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदान (Rohit Pawar Allegations On Ajit Pawar) एकूण ११ मतदारसंघांमध्ये पार पडत आहे. त्याच्या प्रश्नाला उत्तर देण्याची मला गरज वाटत नाही, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे. ते म्हणाले की, ही गावकीची भावकीची निवडणूक नाही. ही देशाच्या पुढील ५ वर्षांचं भवितव्य ठरवणारी निवडणूक असल्याचं अजित पवारांनी म्हटलं आहे. अजित पवारांनी रोहित पवारांचा आरोप फेटाळून लावला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.