Lok Sabha Voting LIVE: महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांना सायबर पोलीस विभागाकडून क्लीन चिट

Lok Sabha Election 2024 Voting LIVE: देशभरात लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यातील मतदान आज शुक्रवारी पार पडत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ८ मतदारसंघाचा समावेश आहे.
Maharashtra Lok Sabha Election Voting LIVE
Maharashtra Lok Sabha Election Voting LIVE Saam TV

महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांना सायबर पोलीस विभागाकडून क्लीन चिट

उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी अर्चना पाटील यांनी गर्दी जमवण्यासाठी पैसे देऊन गर्दी जमावल्याची तक्रार महाविआचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी केला होता. निंबाळकर यांनी पुरावा म्हणून व्हिडिओ पाठवला होता.

Nanded News : नांदेडमध्ये कुऱ्हाडीने ईव्हीएम मशीन फोडणाऱ्याला पोलिसांकडून अटक

नांदेड लोकसभा मतदारसंघातील एका केंद्रात तरुणाने कुऱ्हाडीने ईव्हीएम मशीन फोडल्याची घटना घडली.ईव्हीएम फोडणाऱ्या तरुणाचे नाव भय्यासाहेब एडके असे नाव आहे. या तरुणाला पोलिसांनी अटक करण्यात आलीय. कुऱ्हाडीने बॅलेट EVM-VVPATचं नुकसान झालंय, परंतु कंट्रोल युनिट सुरक्षित असल्याने तेथे आधी झालेले मतदान सुरक्षित आहे. नवीन ईव्हीएम आणून परत मतदान प्रक्रिया सुरू करण्यात आलीय. नुकसान झालेल्या ईव्हीएममध्ये १८५ मतदान झालं होत, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिलीय.

Nashik Election : हेमंत गोडसे यांचे पुत्र आणि सुनबाईंनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

आज हेमंत गोडसे यांच्यासोबत भक्ती गोडसे यांच्याही नावानं उमेदवारी अर्ज घेण्यात आला. खूप कामं केलीत, आमच्यावर विश्वास टाका आम्ही तो सार्थ करू, अशी भक्ती गोडसे यांनी मुख्यमंत्र्यांना गळ घातल्याची माहिती सुत्रांनी दिलीय.

- उद्धव ठाकरे यांची रविवारी रत्नागिरीमध्ये मोठी सभा

- रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे यांची रत्नागिरीत सभा

- रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात विनायक राऊत यांच्या विरोधात महायुतीकडून भाजपचे उमेदवार नारायण राणे यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांची रत्नागिरीमध्ये सभा

- त्यामुळे विरोधात महायुतीकडून उभे असलेल्या नारायण राणे यांच्याविरोधात ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष

- रत्नागिरी दौऱ्यावर उद्धव ठाकरे यांच्यासोबत सभेला तेजस ठाकरे आणि रश्मी ठाकरेसुद्धा उपस्थित राहणार आहेत

नांदेड शहरातील मलाबार ज्वेलर्स शॉपच्या बोर्डला मोठी आग

नांदेड शहरातील शिवाजीनगर रोडवरील मलाबार ज्वेलर्स शॉप च्या बोर्डला मोठी आग लागल्याने धावपळ उडाली.शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या बाजूला मुख्य रोडवर मलाबार ज्वेलर्स चे दुकान आहे. सायंकाळी 6 च्या सुमारास दुकानाच्या वरच्या बाजूला असलेल्या बोर्ड अचानक आग लागली.

  Sangali News : जत तालुका अध्यक्ष प्रमोद सावंत यांच्यावर निलंबनाची कारवाई

सांगलीमधील जत तालुक्यातील भाजपचे तालुका अध्यक्ष प्रमोद सावंत यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय. पक्षविरोधी कारवाया करत असल्याचा ठपका ठेवत त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. काँग्रेसचे अपक्ष बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांचा प्रचार करत असल्याने ही कारवाई करण्यात आलीय.

Maharashtra Election: दिंडोरी आणि नाशिक मतदारसंघासाठी ६४ उमेदवारांनी नेले १२७ अर्ज

२० दिंडोरीसाठी उमेदवारांनी १७ उमेदवारांनी ४० अर्ज घेतले. तर २१ नाशिकसाठी ४७ उमेदवारांनी ८७ अर्ज घेतले. लोकसभा निवडणूक २०२४ ची नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अधिसूचना २६ एप्रिल रोजी प्रसिद्ध झाल्यानंतर पहिल्याच दिवशी २० दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी १७ उमेदवारांनी ४० अर्ज घेतले. तर २१ नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी ४७ उमेदवारांनी ८७ अर्ज घेतले.

Wardha Election :  वर्ध्यातील लोकसभा मतदारसंघात 56.67 टक्के मतदान

Akola Loksabha Election:  अकोल्यात 5 वाजेपर्यत 52.49 टक्के मतदान

अकोला लोकसभा मतदारसंघातील 6 विधानसभेच्या टक्केवारी

अकोला पूर्व- 49.10 टक्के

अकोला पश्चिम- 47.38 टक्के.

अकोट - 52.30 टक्के.

बाळापुर : 56.36 टक्के.

मूर्तिजापुर- 56.93 टक्के.

रिसोड- 53.80 टक्के.

एकत्रित अकोला लोकसभेच्या मतांची टक्केवारी. 52.49 टक्के इतकी आहे.

Amol Kolhe :  महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांचा उमेदवारी अर्ज वैध

शिरूर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांचा उमेदवारी अर्ज वैध. शिरूर लोकसभेतील अपक्ष उमेदवारांनी आक्षेप घेतला होता. शिरूर लोकसभेमध्ये काही अपक्ष उमेदवारांची उमेदवारी अवैद्य करण्यात आलीय.

Election Rally :  नारायण राणे यांच्या प्रचारार्थ महायुतीची जाहीर सभा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सभास्थळी आगमन

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा राजापूर येथील राजीव गांधी क्रीडांगणावर होत आहे. सभास्थळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आगमन झाले आहे.

Parbhani Election : भरउन्हातही मतदान केंद्रावर लागल्या मतदारांच्या रांगा; ३ वाजेपर्यंत 44.49टक्के मतदान

परभणी शहरासह जिल्ह्यात मतदानचा उत्साह दिसून येत आहेत. जिल्ह्यातील आजचे तापमान 41.5असताना मतदाराच्या रांगा लागत आहेत. तीन वाजेपर्यंत 44.49टक्के मतदान झाले असून मतदान केंद्रावर मतदारांनी रांगा लागल्या असल्याने यंदा मतदान 70टक्के पेक्षा जास्त होईल असा अंदाज व्यक्त होत आहे. तर गेल्या २०१४ ला ६४. ६४ टक्के तर २०१९ ला ६३.१९ झाले होते.

Yavatmal Loksabha Election: यवतमाळच्या हिवरी मतदान केंद्रावर जेवणासाठी मतदान प्रक्रिया ठेवली बंद

जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी शासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. मतदार वेळातून वेळ काढून मतदान केंद्रांवर दाखल होत असतात. यवतमाळच्या हिवरी येथील मतदान केंद्रावर चक्क दुपारच्या जेवणासाठी कर्मचाऱ्यांनी मतदान केंद्र बंद ठेवून पंगतीत बसून जेवण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे मतदानाच्या दिवशी मतदानाची वेळ संपेपर्यंत मतदान प्रक्रिया बंद ठेवता येत नाही तरी देखील हिवरी येथील मतदान बूथवरील कर्मचाऱ्यांनी सर्व नियम ढाब्यावर ठेवून मतदान प्रक्रिया बंद ठेवून जेवण केल्याने मतदारांना मनस्ताप सहन करावा लागला.

Hingoli Election : हिंगोलीमध्ये दिव्यांग मतदारांना पिकअप अँण्ड ड्रॉपची सेवा

हिंगोलीमध्ये लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आणि मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी आणि हिंगोली पालिका प्रशासनाने दिव्यांग मतदारांसाठी स्वतंत्र मतदान केंद्राची उभारणी केली होती. विशेष म्हणजे दिव्यांग मतदारांना त्यांच्या घरून थेट मतदान केंद्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी पाच वाहनांची सोय करत पिकअप अँड ड्रॉपची सेवा देण्यात आलीय.

Washim Loksabha Election : वाशिम लोकसभा मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत 42.55 टक्के मतदान

सकाळी 7 ते 3:30 वाजता दरम्यान विधानसभा मतदारसंघनिहाय झालेले मतदान

दिग्रस : 45.33 टक्के

कारंजा : 43.20 टक्के

पुसद : 41.67 टक्के

राळेगाव : 48.72 टक्के

वाशिम : 42.58 टक्के

यवतमाळ : 35.72 टक्के

Akola Election : अकोल्यात ७० कामगाराचा कुटुंबीयांनी मतदानावर घातलेला बहिष्कार मागे घेतला

अकोल्यात ७० कामगार कुटुंबीयांकडून घेण्यात आलेला मतदानावर बहिष्कार आता मागे घेण्यात आलाय. जिल्हा प्रशासनासह अकोला शहराचे तहसीलदारांनी या कामगार कुटुंबीयांची समजूत काढण्यासाठी बिर्ला कॉलनी इथं पोहचले होते आणि त्यात ते यशस्वी झाले. अकोला शहरातील बिर्ला कॉलनीतील ७० कामगार कुटुंबीयांनी अकोला लोकसभा मतदानावर बहिष्कार टाकला. आता हा बहिष्कार मागे घेतलाय. आता जवळपास ७० कुटुंबातील ३०० जण मतदान करणार आहेत.

Loksabha Election :  लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत ४३.०१ टक्के मतदान

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज सकाळी ७.००वाजेपासून सुरू झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील एकूण ८ मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी ४३.०१ टक्के मतदान झाले आहे.

दुसऱ्या टप्प्यातील एकूण ८ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे

वर्धा - ४५.९५ टक्के

अकोला -४२.६९ टक्के

अमरावती - ४३.७६ टक्के

बुलढाणा - ४१.६६ टक्के

हिंगोली - ४०.५० टक्के

नांदेड - ४२.४२ टक्के

परभणी -४४.४९ टक्के

यवतमाळ - वाशिम -४२.५५ टक्के

Wardha Election: वर्ध्यात दुपारी 3 वाजेपर्यंत 45.95 टक्के मतदान

वर्ध्यात दुपारी 3 वाजेपर्यंत वर्धा लोकसभा मतदारसंघात 45.95 टक्के मतदान झाले आहे.

Parbhani Loksabha Election : नवरदेवाने लग्नाअगोदर बजावलं मतदानाचं कर्तव्य

परभणी लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान होत आहे. आज विवाहांचा मुहूर्त असल्याने अनेकांनी यादिवशीच विवाहाची तारीख ठरवली होती. शहरातील प्रफुल्ल आनंद गौड या युवकाचा ही विवाह ठरला होता. विवाहाची सर्व तयारी झाली. मात्र मतदान असल्याने नवरदेव असलेल्या प्रफुल्ल याने लग्नाअगोदर मतदान करण्याचे ठरवले.

Kalyan Loksabha Election: कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आजपासून सुरुवात

कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आजपासून सुरुवात झालीय. कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे शिंदे यांनीही उमेदवारी अर्ज घेतलाय. आज दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केलाय. बहुजन समाज पक्ष आंबेडकर गटाकडून सुशिला कांबळे तर राईट टू रेकॉल पक्षाकडून अमित उपाध्या यांनी अर्ज दाखल केलाय. आत्तापर्यंत १८ जणांनी अर्ज घेतलाय.

Nashik Loksabha Election : शांतिगिरी महाराजांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

शांतिगिरी महाराज उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचले आहेत. शांतिगिरी महाराजांच्या प्रतिनिधींनी सकाळी उमेदवारी अर्ज घेतला होता. शांतिगिरी महाराजांनी एकूण ४ अर्ज घेतलेत. शांतिगिरी महाराज आज अपक्ष उमेदवारी अर्ज भरत आहेत.

Parbhani Loksabha Election : परभणीत दुपारपर्यंत ३३.८८ टक्के मतदान

परभणी लोकसभा मतदार संघासाठी सकाळ पासून मतदान सुरू आहे परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी परभणीच्या शिवाजी नगर येथील मराठवाडा हायस्कूल येथे मतदान केले. परभणी लोकसभेसाठी महावीकास आघाडी आणि महायुतीमध्ये सरळ लढत होत आहे. येथे दुपारी एक वाजेपर्यत ३३.८८ टक्के मतदान झाले. २०१९ च्या तुलनेत मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता आहे.

Washim loksabha Election : खासदार भावना गवळींनी बजावला मतदानाचा अधिकार

खासदार भावना गवळी यांनी मतदानाचा अधिकार बजावला. वाशिमच्या राजेंद्र प्रसाद विद्या मंदिर परिसरातील शाळेत असलेल्या मतदान केंद्रात जाऊन आपल्या मतदानाचा अधिकार बजावला.

Washim Loksabha Election : वाशिममध्ये मतदानावर उन्हाचा तडाखा;  मतदान केंद्रावर शुकशुकाट

मतदान केंद्रांवर दुपारच्या सत्रात उन्हाचा परिणाम दिसून येतोय. वाशिम शहरातील अनेक बुथवर शुकशुकाट बघायला मिळत आहे. याचा परिणाम मतदानाच्या टक्केवरीवर होणार आहे.

Akola Election : अनेक मतदान न करता मतदारांना फिरावं लागतंय माघारी

अकोल्यात आज सकाळपासून मोठ्या उत्साहात मतदानाला सुरूवात झालीये. मतदार मतदान केंद्रांवर मतदानासाठी मोठी गर्दी करतायत. मात्र अनेक मतदान केंद्रांवर मतदार मतदान न करता माघारी फिरत आहेत. मतदार यादीत नाव नसल्याने मतदारांना आल्या पावली माघारी जावं लागतं आहे. अकोल्यातील कृषीनगर भागातील मतदान केंद्रांवरील. मतदार यादीत नाव नसल्याचा हा घोळ मोठ्या प्रमाणात दिसतोय. आज सकाळपासून शेकडो मतदार यादीत नाव नसल्याने मतदार आपला हक्क बजावता येत नाहीये.

Nashik LokSabha Election : उमेदवार निश्चित होण्याआधीच खासदार हेमंत गोडसेंनी घेतला उमेदवारी अर्ज

नाशिक लोकसभा मतदार संघासाठी विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी उमेदवारी अर्ज घेतला आहे. महायुतीकडून उमेदवारी निश्चित नसताना उमेदवारी अर्ज घेतला. नाशिक लोकसभेवर शिवसेनेसह राष्ट्रवादीनेदेखील दावा केलाय. सकाळी छगन भुजबळ यांचे निकटवर्तीय दिलीप खैरे यांनी उमेदवारी अर्ज घेतलाय.

Loksabha Election : जे पी गावित यांनी शक्ती प्रदर्शन करत भरला उमेदवारी अर्ज

नाशिक दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील माकपचे उमेदवार जे पी गावित यांनी शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय.

अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्यात क्लस्टर बैठक

- अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्यात क्लस्टर बैठक

- सगळ्या प्रमुख जिल्हा अध्यक्ष आणि आमदारांना या बैठकीसाठी बोलवण्यात आले आहे

- आगामी लोकसभा निवडणूक रणनीती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यात होणाऱ्या सभेच्या संदर्भात प्रमुख बैठक

Maharashtra Election :  महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.७७ टक्के मतदान

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील आठ मतदारसंघांत मतदान होत असून, दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३१.७७ टक्के मतदान झाले आहे.

वर्धा - ३२.३२ टक्के

अकोला -३२.२५ टक्के

अमरावती - ३१.४०टक्के

बुलढाणा - २९.०७ टक्के

हिंगोली - ३०.४६ टक्के

नांदेड - ३२.९३ टक्के

परभणी -३३.८८ टक्के

यवतमाळ - वाशिम -३१.४७ टक्के

Sanjay Deshmukh- Sanjay Rathod : मंत्री संजय राठोडांना पाचपर्यंत आकडे मोजता येते का? उमेदवार संजय देशमुख यांचा सवाल

'मी,दोन वेळा अपक्ष निवडून आल्यानंतर सुद्धा शिवसेनेला समर्थन केलं. मी कधी कोणत्याही पक्षात गेल्यानंतर बंडखोरीचा ठपका लावला नाही. बंडखोरीचा शिक्का मंत्री संजय राठोड यांच्या कपाळावर लागलेला आणि कायमस्वरूपी लागलेला आहे. बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना चार वेळा आमदारकी दिली. दोन वेळा मंत्रिपद दिलं तरीही त्यांनी बंडखोरी केली, अशी जोरदार टीका महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांनी केलाय.

Parbhani : परभणीत दिव्यांग आणि वयोवृद्धांनी केले मतदान

दुसऱ्या टप्यातील परभणी लोकसभा मतदारसंघासाठी सकाळी सात वाजल्या पासून मतदान सुरू झालेलं आहे. या मतदानात दिव्यांग आणि वयोवृद्धांनी मतदानाचा हक्क बजवला.

Sharad pawar : मी म्हातारा झालो नाही, वयाचं कशाला काढता ? शरद पवार

मी म्हातारा झालो नाही, वयाचं कशाला काढता ? असा सवाल शरद पवारांनी सत्ताधाऱ्यांना केला आहे.

Raj Thackeray News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या घरी समन्वयकांची बैठक

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी समन्वयकांची बैठक सुरू सुरु आहे.

आमदार राजू पाटील, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे यांच्यासह अनेक नेते उपस्थित

 Amravati News : अमरावतीत मतदाराचं नाव यादीतून गायब, मतदानापासून वंचित राहावे लागणार?

मतदारयादीमध्ये अमरावती येथील आगरकर कुटुंबातील जवळजवळ 25 जणांचे नाव एकाच मतदान केंद्रावर आहे. मात्र त्याच वेळेस उमेश आगरकर यांच्या पत्नी प्रिती उमेश आगरकर यांचं नाव मतदारयादीत नसल्याने आता मतदानापासून वंचित राहावे लागणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Maharashtra Elecion : महाराष्ट्रातील ८ मतदारसंघात सकाळी ११ पर्यंत १८.८३ टक्के मतदान

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज होत आहे. महाराष्ट्रातील आठ मतदारसंघांमध्ये मतदान होत असून, सकाळी ११ पर्यंत सरासरी १८.८३ टक्के मतदान झाले आहे.

वर्धा - १८.३५ टक्के

अकोला -१७.३७ टक्के

अमरावती - १७.७३टक्के

बुलढाणा - १७.९२ टक्के

हिंगोली - १८.१९ टक्के

नांदेड - २०.८५ टक्के

परभणी -२१.७७ टक्के

यवतमाळ - वाशिम -१८.०१ टक्के

Yavatmal Washim Voting : यवतमाळ - वाशिममध्ये 11 वाजेपर्यंत 18.01 टक्के मतदान

दिग्रस : 20.22 टक्के

कारंजा : 27.22

पुसद : 18.69

राळेगाव : 20.85

वाशिम : 20.26

यवतमाळ : 11.56 टक्के

Akola Lok Sabha constituency : अकोल्यात 11 वाजेपर्यंत 17.37 टक्के मतदान

अकोला पूर्व - 14.25 टक्के

अकोला पश्चिम - 16.07

अकोट - 16.27

बाळापुर : 19.50

मूर्तिजापुर- 19.47

रिसोड- 19.14 टक्के

Amravati News : अकोल्यात 70 कुटुंबांकडून मतदानावर बहिष्कार

अकोल्यात दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानाला सकाळपासून उत्साहात सुरूवात झाली. पण आता अकोल्यात 70 कुटुंबियांनी मतदानावर बहिष्कार टाकला. अकोला शहरातील बिर्ला कॉलनीतील 70 कामगार कुटुंबीयांनी अकोला लोकसभा मतदानावर बहिष्कार टाकला आहे.

Amravati Lok Sabha : अमरावतीचे उमेदवार दिनेश बुब यांनी केलं मतदान

अमरावती लोकसभा मतदारसंघाचे प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार दिनेश बुब यांनी आज अमरावतीच्या नेहरू शाळेमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला.

मतदान करण्याचे मतदारांना आवाहन

मी निवडून येईल असा शंभर टक्के विश्वास आहे, दिनेश बुब यांना विश्वास

Parbhani News : अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी मतदानावर बहिष्कार, सकाळपासून एकही मतदान नाही

परभणी तालुक्यातील बलसा खुर्द गावातील ग्रामस्थांनी अतिक्रमण करण्याच्या मागणीसाठी लोकसभेच्या निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार घातला आहे. सकाळपासून आतापर्यंत गावातील एकही मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला नाही. गावात बाराशेच्या आसपास मतदान आहे. आमच्या मागण्या पूर्ण करा, अशी मागणी यावेळी बलसा खुर्द येथील ग्रामस्थांनी केली आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही किंवा लिखित स्वरूपात आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत मतदानावर बहिष्कार कायम राहील, असा पवित्रा बलसाखुर्द येथील ग्रामस्थांनी घेतला आहे.

Wardha News : वर्ध्यात सकाळपासून अॅप बंद असल्याने मतदारांना त्रास

- सकाळी साडे आठ वाजतापासून बिएलओ अॅप बंद

- सकाळपासून अॅप बंद असल्याने मतदारांना त्रास

- अॅप बंद असल्याने नागरिक आपले मतदान कुठे आहे हे शोधण्यासाठी धावपळ

- मतदान केंद्र सापडत नसल्याने मतदार गोंधळलेले

- नाराज मतदा्रांकडून बीएलओना शिवीगाळ

- बिएलओ ऍप सुरु केल्यावर केवळ स्क्रीनच समोर

- मतदानाची टक्केवारी वाढेल काय हा प्रश्न?

हिंगोली लोकसभा मतदारसंघात मतदानापूर्वी मशीन बदलल्या, मतदान सुरळीत सुरू

हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये सकाळी मतदानापूर्वी अनेक मतदान केंद्रावर मशीन बदलण्यात आल्या आहेत. तांत्रिक अडचणी आल्यामुळे मतदानापूर्वी ३९ बीयू 16 सियू आणि 25 व्हीव्हीपॅट मशीन बदलण्यात आल्याची माहिती ही हिंगोलीच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान, मतदान सुरू झाल्यानंतर देखील दोन ठिकाणी मशीन बदलण्यात आल्या आहेत. सध्या १००८ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी दिली आहे.

Lok Sabha Voting LIVE: दुसऱ्या टप्प्यातील ८८ जागांसाठी आतापर्यंत किती टक्के मतदान? वाचा आकडेवारी

देशात दुसऱ्या टप्प्याच्या 88 जागेसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळी 10 वाजेपर्यंत कोणत्या राज्यात किती टक्के मतदान झालं आहे -

आसाम: 9.71 टक्के

बिहार: 9.84 टक्के

छत्तीसगढ: 15.42 टक्के

जम्मू आणि कश्मीर: 10.39 टक्के

कर्नाटक: 9.21 टक्के

केरळ: 11.98 टक्के

मध्यप्रदेश: 13.82 टक्के

महाराष्ट्र: 7.45 टक्के

राजस्थान: 11.77 टक्के

त्रिपुरा: 16.65 टक्के

उत्तर प्रदेश: 11.67 टक्के

पश्चिम बंगाल: 15.68 टक्के

Wardha Lok Sabha Voting LIVE: वर्ध्यात अमर काळेंनी बजावला मतदानाचा हक्क, मतदारांना केलं खास आवाहन

वर्धा लोकसभा मतदासंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळे यांनी आर्वी येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदान केलं. यावेळी त्यांच्या पत्नी देखील सोबत होत्या. देशाचं भवितव्य घडवणारी निवडणूक असल्याने सर्वांनी मतदान करावे. ही लोकशाही वाचविण्याची निवडणूक आहे, असं अमर काळे यांनी म्हटलं आहे.

एकट्या अमर काळेला हरविण्यासाठी या मतदारसंघट मोदी, योगी, गडकरी, फडणवीस, अजित पवार यांना सभा घ्याव्या लागतात. म्हणजेच त्यांना रिपोर्टींग झालं असेल की वर्ध्यात काय वातावरण आहे, असा टोलाही अमर काळे यांनी लगावला आहे.

Hingoli Lok Sabha Voting LIVE: आमदार संतोष बांगर यांनी बजावला मतदानाचा हक्क, जय श्रीरामच्या दिल्या घोषणा

शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी हिंगोली येथे मतदानाचा हक्क बजावला. मतदान झाल्यानंतर मतदान केंद्रावरच त्यांनी "जय श्रीराम" अशा घोषणा दिल्या आहेत. हिंगोलीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे हेमंत पाटील हे विद्यमान खासदार आहेत, परंतु महायुती आघाडीने यावेळी बाबुराव कदम कोहळीकर यांना तिकीट दिले आहे. त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीने शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नागेश आष्टीकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे.

Lok Sabha Voting LIVE: महाराष्ट्रातील ८ लोकसभा जागांसाठी आतापर्यंत किती टक्के मतदान? पाहा आकडेवारी

महाराष्ट्रातील ८ लोकसभा मतदारसंघात आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, ९ वाजेपर्यंत किती टक्के मतदान झालं, याची आकडेवारी समोर आली आहे.

सकाळी 9 वाजेपर्यंत मतदानाची 7.45 टक्केवारी

वर्धा 7.18 टक्के मतदान

अकोला 7.17 टक्के मतदान

अमरावती 6.34 टक्के मतदान

बुलढाणा 6.61 टक्के मतदान

हिंगोली 7.23 टक्के मतदान

नांदेड 7.73 टक्के मतदान

परभणी 9.72 टक्के मतदान

यवतमाळ-वाशिम 7.23 टक्के मतदान

Akola Lok Sabha Voting LIVE: प्रकाश आंबेडकरांनी बजावला मतदानाचा हक्क

अकोला मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. पत्नीसह मतदान केंद्रावर प्रकाश आंबेडकर यांनी मतदान केलं आहे.

Parbhani Lok Sabha Voting LIVE: आमदार राजेश टोपेंनी बजावला मतदानाचा हक्का

रभणी लोकसभा मतदारसंघासाठी आज दुसऱ्या टप्प्यात मतदान पार पडत आहे. सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. माजी आरोग्य मंत्री आमदार राजेश टोपे यांनी आज परभणी लोकसभा मतदार संघात असलेल्या त्यांच्या मूळ गाव जाऊन मतदानाचा हक्क बजावला आहे. पाथरवाला बुद्रुक गावातील मतदान केंद्रावर जाऊन राजेश टोपे यांनी मतदान केलं आहे.

यावेळी त्यांच्या पत्नी मनीषा टोपे या देखील मतदान करण्यासाठी आल्या होत्या. महागाईमुळे लोक त्रस्त आहेत. राज्यात आणि देशात फोडाफोडीचे राजकारण सुरु असल्याने लोक आता मोठ्या प्रमाणात मतदानाचा हक्क बजावत आहे. त्यामुळे सत्याचा विजय होईल, अशी प्रतिक्रिया राजेश टोपेंनी साम टीव्हीला दिली आहे.

Akola Lok Sabha Voting LIVE: अकोल्यात नवरदेवाने मतदानाचा हक्क बजावला

अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील नवरदेवाने बोहल्यावर चढण्याआधी मतदानाचा हक्क बजावला. दहिगाव अवताडे येथील मतदान केंद्रावर येऊन नवरदेवाने मतदान केले. यावेळी वर राहुल महादेवराव सोळंके रा.दहिगाव याचे सरपंच रविकिरण काकड, पोलीस पाटील अरविंद अवताडे तलाठी संदीप ढोक यांनी स्वागत केले.

Nanded Lok Sabha Voting LIVE: नांदेडमध्ये EVM मध्ये तांत्रिक बिघाड, अधिकाऱ्यांची धावपळ; मतदार ताटकळले

नांदेडच्या माहूर तालुक्यातील टाकळी येथील मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन बंद पडलं आहे. जवळपास १ तासापासून ईव्हीएम बंद पडल्याने मतदान प्रक्रिया खोळंबली आहे. त्यामुळे मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. प्रशासनाकडून ईव्हीएममधील तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याचे प्रयत्न सुरू आहे.

Maharashtra Lok Sabha Voting LIVE: महाराष्ट्रातील ८ जागांवर संथ गतीने मतदान; अनेक ठिकाणी EVM मशीनमध्ये खोळंबा

महाराष्ट्रातील लोकसभेच्या ८ जागांवर आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. नागरिकांनी मतदानाला भरभरुन प्रतिसाद दिला असला, तरी संथ गतीने मतदान सुरू आहे. याचे कारण म्हणजे अनेक ठिकाणी EVM मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचं पाहायला मिळालं आहे. अमरावती, अकोला आणि वर्धा येथे ईव्हीएम मशीन बंद पडलं आहे. त्यामुळे मतदान करण्यासाठी मतदार खोळंबले आहेत.

Yavatmal Lok Sabha Voting LIVE: यवतमाळमध्ये मतदानास सुरुवात; नागरिकांमध्ये मोठा उत्साह

यवतमाळ शहरात 418 मतदान केंद्रावर मतदानाला सुरूवात झाली असून भल्यापहाटे मतदार मतदान केंद्रावर दाखल होत आहेत. यवतमाळ - वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी आज दुसर्‍या टप्प्यात मतदान होत असून मतदान केंद्रावर तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. यवतमाळच्या चार विधान सभा मतदारसंघात ९ हजार कर्मचारी मतदान बूथवर कर्तव्य बजावत असून ६ हजार पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात आहेत.

Maharashtra Lok Sabha Voting LIVE: दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात; मतदान केंद्राबाहेर नागरिकांच्या लांबच लांब रांगा

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला शुक्रवारी पहाटे ७ वाजेपासून सुरुवात झाली आहे. मतदान करण्यासाठी नागरिकांनी मतदान केंद्राबाहेर लांबच लांब रांगा लावल्या आहेत. कुठलाही अनूचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला आहे.

महाराष्ट्रातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशीम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या लोकसभा मतदारसंघांत मतदान पार पडत आहे. या आठही मतदारसंघात अटीतटीची लढाई होणार आहे. त्यामुळे दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

Amravati Lok Sabha Voting LIVE: अमरावतील लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत; सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरुवात

अमरावती लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार नवनीत राणा काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे आणि प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांच्यात तिरंगी लढत होत आहे. सकाळी ७ वाजेपासून अमरावतीत मतदानाला सुरुवात झाली आहे. राणा आणि कडू यांच्यातील वाढती कडूता पाहता, या निवडणुकीत नेमकं कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

Akola Lok Sabha Voting LIVE: अकोला लोकसभा मतदारसंघात ७ वाजेपासून मतदान सुरू

अकोला लोकसभा मतदारसंघातील अकोला जिल्ह्यातील सर्वच मतदान केंद्रावर तयारी पूर्ण झाली आहे. आता सकाळी ७ वाजल्या पासून मतदानास सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे अकोला लोकसभा मतदारसंघात एकूण मतदान केंद्रांपैकी ५० टक्के मतदान केंद्रांवर वेब कास्टिंग करण्यात आली आहे.

यंदा अकोला लोकसभा मतदार संघात एकून १८ लाख ७५ हजार ६३७ एवढे मतदार आहे. ज्यामध्ये पुरुष मतदार ९ लाख ७० हजार ६६३, तर महिला मतदार ९ लाख ४ हजार ९३४ एवढी आहे.

Parbhani Lok Sabha Voting LIVE: परभणी लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान; एकूण ३४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

परभणी लोकसभा मतदार संघात आज मतदान होणार असून मतदानाची निवडणूक विभागाने पूर्ण तयारी केलीय. सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे. परभणी लोकसभा मतदारसंघातून एकूण ३४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. परभणीत २ हजार २९० मतदान केंद्र असून साडेबारा हजार कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे.

मतदान केंद्रांवर ३ हजार ८०० पोलिसाचा बंदोबस्त असणार आहे. उन्हाची तीव्रता पाहता मतदारांना सावली तसेच फर्स्ट एड बॉक्स व चॉकलेट, गोळया व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तर ४७ संवेदनशील मतदान केंद्रात खबरदारी साठी व्हिडीओ शुटींग काढण्यात येणार आहे.

Nanded Lok Sabha Voting LIVE: नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान; मतदान केंद्रावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त 

नांदेड लोकसभेसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली. कर्मचारी देखील सज्ज झाले आहेत. नांदेड लोकसभेसाठी 18 लाख 51 हजार मतदार असून पुरुष मतदारांची संख्या 9 लाख 55 हजार तर महिला 8 लाख 96 हजार 617 संख्या आहे. 142 तृतीयपंथी मतदार देखील आहेत. 2 हजार 68 मतदार केंद्रावर मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे.दरम्यान 10 हजाराहून अधिक अधिकारी, कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत

Wardha Lok Sabha Voting LIVE: वर्धा लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान; २४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

वर्धा लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान होणार आहे. एकूण २४ उमदेवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत जिल्ह्यातील मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. १ हजार ९९७ मतदान केंद्र असणार आहेत. मतदानाची तयारी मतदान केंद्रावर पूर्ण झाली असून पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला आहे.

Maharashtra Lok Sabha Voting LIVE: महाराष्ट्रातील ८ लोकसभा मतदारसंघात आज मतदान; 'या' दिग्गजांचं भवितव्य पणाला

Maharashtra Lok Sabha Election Voting LIVE Updates

देशभरात लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यातील मतदान आज शुक्रवारी पार पडत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ८ मतदारसंघाचा समावेश आहे. राज्यातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ- वाशिम, परभणी, हिंगोली, नांदेड या मतदारसंघात आज मतदान होणार आहे. थोड्याच वेळात मतदानाला सुरुवात होणार असून मतदान केंद्रावर पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला आहे.

८ मतदारसंघात अशी होणार लढत

अकोला मतदारसंघ: भाजपचे अनुप धोत्रे विरुद्ध काँग्रेसचे अभय काशिनाथ पाटील यांच्यात लढत होईल.

बुलढाणा मतदार संघ: शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्याविरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर

अमरावती मतदारसंघ: भाजपच्या उमेदवार नवनीत राणा विरुद्ध काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे

वर्धा मतदारसंघ: भाजपचे रामदास तडस विरुद्ध राष्ट्रवादी शरचंद्र पवार पक्षाचे उमेदवार शरद काळे

यवतमाळ - वाशिम मतदारसंघ: शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार राजश्री पाटील विरुद्ध ठाकरे गटाचे उमेदवार संजय देशमुख

हिंगोली मतदारसंघ: शिवसेना शिंदे गटाचे बाबुराव कोहलीकर विरुद्ध ठाकरे गटाचे उमेदवार नागेश अष्टीकर

नांदेड मतदारसंघ: भाजपचे प्रतापराव चिखलीकर विरुद्ध काँग्रेसचे वसंतराव चव्हाण यांच्यात थेट लढत होईल.

परभणी मतदारसंघ: रासपचे महादेव जानकर विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे संजय जाधव यांच्यात काटे की टक्कर पाहायला मिळेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com