Manoj Jarange Patil Saam TV
लोकसभा २०२४

Nashik Loksabha: नाशिकमध्ये मराठा समाजाची महाविकास आघाडीला साथ! २ उमेदवारांना पाठिंबा जाहीर; महायुतीचं टेन्शन वाढणार?

Nashik Loksabha Constituency News: सभेच्या आधीच महायुतीला मोठा धक्का बसला असून मराठा समाजाकडून नाशिकसह दिंडोरी लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे.

Gangappa Pujari

नाशिक, ता. १६ मे २०२४

लोकसभेचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक दौऱ्यावर येत आहेत. नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांचा भव्य रोड शो आणि प्रचारसभा होणार आहे. मात्र या सभेच्या आधीच महायुतीला मोठा धक्का बसला असून मराठा समाजाकडून नाशिकसह दिंडोरी लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे.

नाशिक जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातून राजाभाऊ वाजे तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भास्कर भगरे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजावर अन्याय करणाऱ्या, मराठा समाजाच्या मागण्यांना पाठिंबा न देणाऱ्यांना पाडण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यांच्या सूचनेनुसार राजाभाऊ वाजे आणि भास्कर भगरे यांना पाठिंबा देत असल्याचं मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, लोकसभेची उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून भेटीचे आमंत्रण देण्यात आले होते, असा मोठा दावा अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराजांनी केला आहे. गिरीश महाजनकडून मोदी भेटीचं निमंत्रण देण्यात आले होते. मात्र मतदार संघात फिरत असल्यामुळे मोदींची भेट घेऊ शकलो नाही, तसेच भेट घेतली तरी माघार घेणार नसल्याचे मी सांगितले होते, असेही शांतिगिरी महाराजांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hotel Kitchen Food : धक्कादायक! तुमच्या जेवणात कचरा ? व्हिडिओ पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल | VIDEO

Ramayana: जगातील सर्वात भव्य महाकाव्यांचा आरंभ 'रामायण'; अभिनेता रणबीर कपूरची मोठी भूमिका

Bhoj Dam : भोज धरणावर मस्ती भोवली; पर्यटक पाण्याच्या प्रवाहात अडकला, सुदैवाने वाचला जीव

Raj Thackeray: राज ठाकरेंबाबात वादग्रस्त पोस्ट, पुण्यात मनसैनिक आक्रमक; पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील 3 ते 4 तासांसाठी रेड अलर्ट

SCROLL FOR NEXT