Mamata Banerjee  SAAM TV
लोकसभा २०२४

Mamata Banerjee: लोकसभा निवडणुकीत भाजप 195 पेक्षा जास्त जागा जिंकणार नाही, ममता बॅनर्जी यांचा दावा

Lok Sabha Election 2024: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी निवडणुकीनंतर केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यास त्यांना पूर्ण पाठिंबा देऊ, असे म्हटले आहे.

साम टिव्ही ब्युरो

Mamata Banerjee News:

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी निवडणुकीनंतर केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यास त्यांना पूर्ण पाठिंबा देऊ, असे म्हटले आहे. यासोबतच केंद्रातील सध्याच्या सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला 543 जागांपैकी 195 पेक्षा जास्त जागा मिळणार नसल्याचा दावा त्यांनी केला. 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 96 जागांवर चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडले असताना ममता यांनी ही घोषणा केली आहे.

आज ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमधील परगणा जिल्ह्यातील बोनगाव आणि बराकपूर मतदारसंघात दोन सभा घेतल्या. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.

ममता बॅनर्जी म्हणाल्या की, “बंगाल मार्ग दाखवेल. केंद्रात सरकार स्थापन करण्यासाठी बंगाल पूर्ण पाठिंबा देईल. आम्हाला काही नको. फक्त लोकांना जगू द्या. देश वाचला पाहिजे जेणेकरून लोक शांततेत राहतील. देश विकला जाऊ नये. संविधान विकू नये. माणुसकी विकली जाऊ नये. इतकेच आम्हाला हवे आहे."

बराकपूर व्यतिरिक्त ममता बॅनर्जी यांनी बोनगाव येथे एका निवडणूक सभेला संबोधित केले. या भागात दलित मतुआ समाजाचे प्राबल्य आहे. येथे ममता म्हणाल्या की, “लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाच्या तीन फेऱ्या झाल्या आहेत. आता मोदी येणार नाहीत. त्याचा चेहरा बघा, त्यावर हे स्पष्ट दिसेल. आता इंडिया आघाडी जिंकेल, मोदी नाही. आम्ही येथून (बंगाल) मदत करू. कालपर्यंत मिळालेल्या अहवालानुसार त्यांना (भाजप) 195 जागा मिळतील. उर्वरित जागा इंडियाआघाडी आणि काही छोट्या पक्षांना जातील.''

ममता म्हणाल्या की, आता ते त्यांची गॅरंटी देत ​​आहे. 10 वर्षे कुठे होते? दहा वर्षांपूर्वी तुम्ही प्रत्येकाच्या (बँक) खात्यात 15 लाख रुपये आणि दरवर्षी 2 कोटी लोकांना नोकऱ्या देणार असल्याचे सांगितले होते. या 10 वर्षात तुम्हाला 20 कोटी नोकऱ्या मिळाल्या का? मोदींची गॅरंटी 420 व्यतिरिक्त कोणतीही गॅरंटी नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पालघरमध्ये नाट्यगृह, १८ कोटींची पाणी योजना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा|VIDEO

उद्धव ठाकरेंचा भाजपला धक्का; रवींद्र चव्हाण यांच्या जवळच्या नेत्याने घेतली मशाल हाती

Winter Skin Care Tips: हिवाळ्यात सुंदर दिसण्यासाठी त्वचेची काळजी कशी घ्याल?

Maharashtra Live News Update : मंत्री उदय सामंत यांचा राष्ट्रवादीला सूचक इशारा

Soft ParathaTips: पराठे लाटताना फाटतात? नीट शेकत नाहीत? मग फॉलो करा 'या' सिंपल टिप्स

SCROLL FOR NEXT