Ajit Pawar, Eknath Shinde Maharashtra Politics
Ajit Pawar, Eknath Shinde Maharashtra Politics Saam TV
लोकसभा २०२४

Mahayuti Seat Sharing: महायुतीच्या जागावाटपाचा तिढा अखेर दिल्लीत सुटला; शिंदे गटाला किती जागा मिळणार?

Satish Daud-Patil

Mahayuti Seat Sharing Formula

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी (ता. २३) रात्री दिल्लीत महायुतीच्या नेत्यांची महत्वाची बैठक घेतली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती होती. जवळपास दीड सुरू असलेल्या या बैठकीत अखेर महायुतीच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. लवकरच याबाबत अधिकृत घोषणा केली जाणार आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

लोकभा निवडणूक जाहीर होताच भाजपने महाराष्ट्रातील २० लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मात्र, ही यादी जाहीर करून बराच कालावधी उलटला तरी महायुतीच्या जागावाटपाबाबत अंतिम निर्णय झालेला नव्हता. त्यामुळे जागावाटप कधी होणार? असा प्रश्न तिन्ही पक्षातील नेत्यांना पडला होता. (Breaking Marathi News)

त्यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर मनसे देखील महायुतीत सहभागी होणार अशा चर्चा सुरू झाल्या. मनसे महायुतीसोबत आल्यास त्यांना किती जागा मिळणार? याकडे देखील अनेकांचं लक्ष लागून होतं. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अखेर महायुतीचा जागावाटपाचा तिढा सोडवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ३०-१३-०४-०१ असा असणार आहे. भाजप हा महायुतीत मोठा भाऊ असल्याने त्यांना लोकसभेच्या (Breaking Marathi News) ३० जागा मिळणार आहे. त्यापाठोपाठ शिंदे गटाला १३ जागा, अजित पवार गटाला ४ जागा आणि राज ठाकरे यांच्या मनसेला १ जागा मिळणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

मनसेला दक्षिण मुंबईतील जागा मिळणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. बैठकीतील महत्वाची बाब म्हणजे, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जरी लोकसभेच्या १३ जागा मिळणार असल्या, तरी यातील ५ ते ६ जागांवरील नवीन उमेदवार देण्यात यावेत, अशी चर्चाही झाली आहे. त्यामुळे शिंदे गटातून नेमकं कुणाचं तिकीट कापलं जाणार? याकडेही सर्वाचं लक्ष लागून आहे.

दरम्यान, आज भाजपकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर होणार असल्याची माहिती आहे.या यादीत महाराष्ट्रातील काही उमेदवारांच्या नावांचा देखील समावेश असणार आहे. पहिल्या टप्प्यातील भाजपच्या वाट्याला असलेल्या भंडारा गोंदिया आणि गडचिरोली मतदार संघाचे उमेदवार आज जाहीर होणार, असं सूत्रांनी सांगितलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dindori Loksabha Election: दिवस मावळला तरी मतदार येईना; एकही मत न देणारं मेव्हणं गाव आलं चर्चेत

Rahu Gochar Effect: या राशींवर 2025 पर्यंत राहणार राहूची कृपा; प्रकृती चांगली राहील, खूप प्रगती होणार

HIV Vaccine : वैद्यकीय क्षेत्रातून आनंदाची बातमी! HIV वरील व्हॅक्सिनची यशस्वी चाचणी

किंमत फक्त 65,514 रुपये! वजन 93 किलो, मायलेज 50; जबरदस्त आहे TVS ची ही स्कूटर

Zero Shadow Day: चंद्रपुरात नागरिकांनी अनुभवला शून्य सावली दिवस, हे नेमकं काय असतं? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT