Sujay Vikhe vs Nilesh Lanke Saam TV
लोकसभा २०२४

Loksabha Election 2024: निलेश लंकेंची एन्ट्री जोरदार करायची.. काँग्रेस नेत्याचे सूचक विधान; नगर दक्षिणमध्ये विखे विरुद्ध लंके सामना फिक्स!

Nilesh Lanke Vs Sujay Vikhe Patil: काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी निलेश लंके यांच्या उमेदवारीवरुन महत्वाचे विधान केले आहे. त्यामुळे लंके हे महाविकास आघाडीचे उमेदवार असल्याचे जवळपास निश्चित झाल्याचे संकेत दिले आहेत.

Gangappa Pujari

सचिन बनसोडे, अहमदनगर|ता. २४ मार्च २०२४

Balasaheb Thorat News:

लोकसभा निवडणुकीची घोषणा होताच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा अद्याप कायम आहे. अशातच काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी निलेश लंके यांच्या उमेदवारीवरुन महत्वाचे विधान केले असून लंके हे महाविकास आघाडीचे उमेदवार असल्याचे जवळपास निश्चित झाल्याचे संकेत दिले आहेत. (Maharashtra Loksabha Election 2024)

काय म्हणालेत बाळासाहेब थोरात?

"दक्षिण नगरची निवडणूक ही पाहण्याजोगी होईल. निलेश लंके उमेदवारीसाठी तयार आहेत. त्यांची एन्ट्री जोरदार करायची आहे. असे म्हणत निलेश लंके उभे राहतील आणि विजयी होतील," असा विश्वास बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे दक्षिण नगरमधून निलेश लंकेविरुद्ध (Nilesh Lanke) सुजय विखे असा सामना होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आम्ही एकजुटीने काम करु..

तसेच "जागा वाटपावरुन फक्त महाविकास आघाडीत (Mahavikas Aaghadi) नाही तर महायुतीतही तिढा सुरू आहे. आमच्याकडे फक्त तिढा, तिकडे मात्र अनेक तिढे आहेत. आमचे सर्व तिढे सुटतील आणि आम्ही एकजुटीने काम करू, असेही बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) म्हणालेत.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मनसे- भाजप युतीवरुन ठाकरेंना टोला..

तसेच "राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) भाषणाचे आणि लाव रे तो व्हिडिओचे सर्वांनाच कौतुक होते. मात्र ते राज ठाकरे आता दिसत नाहीत. ते महायुतीत गेले तर जनतेत त्यांचा प्रभाव ओसरलेला दिसेल," असे म्हणत मनसे- भाजप (MNS- BJP) युतीबाबतही बाळासाहेब थोरात यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : घरातलं भांडण चव्हाट्यावर; निकालानंतर दादांचे काकांवर आरोप, VIDEO

Maharashtra News Live Updates: रश्मी शुक्ला यांची पुन्हा राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती

Maharashtra Politics: मनसेला EVM वर भरोसा नाय का? अपयशाची सल, EVMमधून खल?

Arjun Tendulkar: सचिनचा लेक रिकाम्या हाती परतला! अर्जुन तेंडुलकर अन्सोल्ड

Maharashtra Politics : अमित शहा मुंबईत येणार, मुख्यमंत्रिपदाची घोषणा करणार? पडद्यामागे काय घडतंय? वाचा

SCROLL FOR NEXT