Solapur Loksabha Constituency News:  Saamtv
लोकसभा २०२४

Solapur News: सोलापूर लोकसभेत चुरस वाढली! वंचितनंतर MIMनेही डाव टाकला; माजी आमदार रमेश कदमांना उमेदवारी देणार?

विश्वभूषण लिमये

Solapur Loksabha Constituency News:

वंचित बहुजन आघाडीने सोलापूर लोकसभेसाठी उमेदवार देण्याची घोषणा केली आहे. अशातच आता एमआयएम देखील लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांची सोलापूर एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतल्यानंतर त्यांच्या उमेदवारीबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. (Loksabha Election 2024)

सोलापूर लोकसभा हे अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघ असल्याने रमेश कदम निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रमेश कदम हे 2014 साली मोहोळ विधानसभेतून आमदार म्हणून निवडणून आले होते. मात्र लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक महामंडळ घोटाळा प्रकरणात गेली अनेक वर्ष तुरुंगात होते. काही महिन्यापूर्वी ते जामीनावर बाहेर आले आहेत.

सध्या ते आगामी लोकसभेच्या दृष्टीने तयारी करत असल्याची माहिती समोर आली होती. अशातच आता रमेश कदम यांनी एमआयएमच्या (MIM) नेत्यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. याआधी वंचित बहुजन आघाडीने सोलापूरमधून राहुल गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली आहे. आता एमआयएमनेही उमेदवार दिल्यास सोलापुर लोकसभेची रंगत आणखीन वाढणार असल्याचे चित्र दिसत आहे.

प्रणिती शिंदे राम सातपुतेंमध्ये लढत!

दरम्यान, सोलापुर लोकसभेसाठी महायुतीकडून भाजप आमदार राम सातपुते यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे (Praniti Shinde) रिंगणात उतरल्या आहेत. अशातच आता वंचित आणि एमआयएमनेही निवडणुकीत रिंगणात उतरण्याची तयारी केल्याने प्रणिती शिंदेंना फटका बसणार असल्याचे बोलले जात आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT