Mahayuti Seat Sharing Saam TV
लोकसभा २०२४

Nashik Loksabha News: नाशिक लोकसभेवरुन शिंदे गट- भाजपमध्ये कलह! भाजप कार्यकर्ते मुंबईकडे रवाना

Maharashtra Loksabha Election 2024: हेमंत गोडसे यांच्या या शक्तीप्रदर्शनानंतर भाजप कार्यकर्तेही आक्रमक झाले असून नाशिकचे भाजप आमदार आणि पदाधिकारी मुंबईकडे रवाना झाले आहेत.

अभिजीत सोनावणे

Nashik Loksabha Constituency News:

नाशिक लोकसभेच्या जागेवरुन महायुतीमधील शिवसेना शिंदे गट आणि भारतीय जनता पक्षामध्ये जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचे दिसत आहे. नाशिकची जागा मिळवण्यासाठी शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांनी शेकडो गाड्यांचा ताफा घेत मुंबईमध्ये दाखल झाले होते. हेमंत गोडसे यांच्या या शक्तीप्रदर्शनानंतर भाजप कार्यकर्तेही आक्रमक झाले असून नाशिकचे भाजप आमदार आणि पदाधिकारी मुंबईकडे रवाना झाले आहेत. (Maharashtra Loksabha Election 2024)

शिंदे गटाचा दावा...

नाशिकचा मतदारसंघ हा पारंपरिक शिवसेनेचा मतदार संघ आहे. त्यामुळे नाशिकची जागा शिवसेना शिंदे गटालाचं मिळेल, असे म्हणत खासदार हेमंत गोडसे यांनी नाशिक लोकसभा शिंदे गटाला देण्याचा दावा केला आहे. तसेच नाशिकच्या जागेवर मित्र पक्ष दावा करत असल्यानं आमच्या भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचण्यासाठी काल मुख्यमंत्र्यांना भेटलो, छगन भुजबळ यांनी जरी नाशिकच्या जागा मागितली असली तरी जागा शिवसेनेलाच मिळेल, असे म्हणत त्यांनी नाशिकच्या जागेवरुन दावा सोडण्यास नकार दिला आहे.

भाजपचीही आक्रमक भूमिका..

अशातच आता हेमंत गोडसे यांच्या शक्तिप्रदर्शनानंतर भाजपने देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. नाशिकमध्ये भाजपची ताकत जास्त असल्यानं नाशिकची जागा भाजपला मिळाली पाहिजे, असा दावा करत नाशिकचे भाजप आमदार आणि पदाधिकारी मुंबईकडे रवाना झाले आहेत. शहरातील सर्व आमदार आणि प्रमुख पदाधिकारी नाशिकच्या जागेसाठी आग्रही आहेत, त्यामुळे नाशिकच्या जागेसंदर्भात देवेंद्र फडणवीसांची (Devendra Fadanvis) भेट घेणार असल्याचे भाजप नेत्यांनी सांगितले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दिनकर पाटील यांचा गोडसेंना इशारा!

तसेच "५० गाड्या घेवून जाणं म्हणजे शक्तिप्रदर्शन नाही, शक्तिप्रदर्शन करायची वेळ आल्यास ५ हजार गाड्या घेवून मुंबईला शक्तिप्रदर्शन करू, असे म्हणत नाशिकची जागा भाजपलाचं मिळेल. हेमंत गोडसेंना उमेदवारी मिळाल्यास भाजपचे कार्यकर्ते त्यांना मदत करणार नाहीत," असा इशाराही भाजप नेते दिनकर पाटील यांनी दिला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Junnar ST Bus Accident: गुंजाळवाडीजवळ शेगाव-कल्याण एसटीचा भीषण अपघात; दोन ते तीनवेळा उलटली बस, दोघांचा मृत्यू, १७ जखमी

चित्रपटसृष्टी हादरली! प्रसिद्ध दिग्दर्शकाची आत्महत्या; नदीमध्ये सापडला मृतदेह

Mumbai Accident: मुंबईत अपघाताचा थरार! सिमेंट मिक्सरने दोघांना चिरडलं, वडिलांच्या डोळ्यासमोर ८ वर्षीय अहानाने सोडले प्राण

Dagdusheth Halwai Ganpati: पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट’ला 'अ' वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा

Diesel Crisis: परभणीत डिझेलची टंचाई, पेट्रोल पंपाबाहेर कॅन घेऊन रांगा; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT