नितीन पाटणकर साम टिव्ही, पुणे
लोकसभा निवडणूकीची तारीख जाहीर झाल्यानंतर राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. आता पुण्यामध्ये महावितरणच्या विरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार करण्यात आली (Violation Of Code Of Conduct Pune Mahavitran) आहे. समाजवादी पार्टीने महावितरणच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. आपण नक्की काय प्रकरण आहे, हे सविस्तर जाणून घेऊ या. (Latest Marathi News)
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर देखील महावितरणकडून राज्य सरकारची जाहिरात असलेल्या वीज बिलांचे वितरण करण्यात आलं होत. समाजवादी पक्षाने आता राज्य सरकारची (Pune Mahavitran) जाहिरात असलेल्या या वीज बिलांवरती आक्षेप घेण्यात आली आहे. यासंदर्भात आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
(साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
समाजवादी पार्टीने महावितरणच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार केली आहे. महावितरणच्या वीज बिलांवरील जाहिरातीमध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे फोटो (Lok Sabha) आहेत. त्याचबरोबर या बिलांवर 'सुराज्य - एक वर्ष सुराज्याचे' असा मजकूर लिहिलेला आहे. आता यावर आक्षेप घेण्यात आला आहे.
वीज क्षेत्रातील कार्यकर्ते आणि समाजवादी पक्षाचे नेते प्रताप होगाडे यांनी केली तक्रार आहे. राज्यातील दोन कोटी 75 लाख वीज ग्राहकांना या वीज बिलांचे वाटप करण्यात येत (Pune News) आहे, असा आक्षेप समाजवादी पक्षाने घेतलेला आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर आचारसंहिता भंगाची तक्रार केली आहे.
वाशिममधील घटना
वाशिम जिल्ह्यात मोदींचा फोटो असलेल्या खतांच्या बॅगची विक्री केली जात आहे. यामुळे आचारसंहितेचा भंग होत असल्याचा आरोप केला जातोय.आचारसंहिता लागू झाल्यावर पक्षाचं चिन्ह, कोणत्याही राजकीय नेत्यांचे फोटो, (Code Of Conduct Lok Sabha Election 2024) सरकारच्या योजनांची जाहिरात देखील केली जात नाही. आता या खतांच्या बॅगमुळे भाजपचा प्रचार होत असल्याचा आरोप समनक जनता पार्टीकडून करण्यात आलाय.
लोकसभा निवडणुकीची आचार संहिता लागू झालेली असतांना वाशिम जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो असलेल्या डीएपी आणि युरिया खतांच्या बॅगची विक्री केली (Lok Sabha 2024) जातेय. त्यामुळे आचारसंहितेचा भंग होत असल्याची तक्रार समनक जनता पार्टीकडून करण्यात आलीय. याबाबत योग्य कारवाई करण्याची मागणी जिल्हाध्यक्ष गजानन धामणे यांनी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.