अमर घटारे, साम टीव्ही अमरावती
मेळघाटातील आदिवासी महिला खासदार नवनीत राणा विरोधात आक्रमक झाल्या आहेत. नवनीत राणांनी वाटलेल्या साड्यांची आदिवासी महिलांनी होळी केली आहे. बामादेही, कोरडा, चुरणी,ढाणा या गावात आदिवासी महिलांनी साड्यांची होळी केली (Tribal Women Celebrated Holi) आहे. निकृष्ठ दर्जाच्या साड्या दिल्याचा आरोप आदिवासी महिलांनी खासदार राणांवर केला आहे. (Latest Marathi News)
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना महिलांच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे. नवनीत राणा यांनी मेळघाटात महिलांना वाटलेल्या साड्यांची होळी (Holi) केली आहे. खासदार नवनीत राणांनी निकृष्ट दर्जाच्या साड्या वाटल्यामुळे या महिलांनी संताप व्यक्त केला.
(साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
मेळघाटातील आदिवासी महिला खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात आक्रमक झाल्या आहेत. बामादेही, कोरडा, चुरणी, ढाणा या गावात महिलांनी साड्यांची होळी केलीय. काही दिवसांपूर्वीच नवनीत राणा यांनी आदिवासी महिलांना साड्या वाटल्या (MP Navneet Rana) होत्या.
राणांनी वाटलेल्या साड्या मच्छदानीसारख्या आहेत. त्या साड्या घालण्यायोग्य नसल्याने महिलांनी संताप व्यक्त केलाय. आमची नवनीत राणा यांनी थट्टा केली असा आरोपही या महिलांनी केला (Sarees Distrition MP Navneet Rana In Melghat) आहे. त्यांनी नवनीत राणांविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली.
राणा दाम्पत्यांनी वाटलेल्या साड्या निकृष्ट दर्जाच्या आहेत. त्या अजिबात घालण्याच्या लायकीच्या नाहीत, असा संताप आदिवासी महिलांनी व्यक्त केलाय. या साड्यांचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले (Lok Sabha Election 2024) होते. निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारच्या साड्या वाटप करून तुम्ही आमची थट्टा लावली आहे का? असा सवाल देखील या महिलांनी उपस्थित केलाय.
राणा दाम्पत्यांनी वाटप केलेल्या साड्या आहेत की मच्छरदान्या, असा प्रश्न आदिवासी महिलांना पडला (Navneet Rana News) आहे. या महिलांनी त्या साड्या जाळून होळी साजरी केली आहे. आदिवासी महिला खासदार नवनीत राणांवर नाराज असल्याचं पाहायला मिळतंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.