Fact Check: रेशनकार्ड धारकांना मोफत ट्रॅक्टर मिळणार? केंद्र सरकारची मोफत ट्रॅक्टर योजना?

PM Modi Announces Free Tractor Scheme: आम्ही व्हायरल होत असलेल्या व्हिडिओची पडताळणी करतो आणि त्याची सत्यता समोर आणतो... आता रेशनकार्ड धारकांना मोफत ट्रॅक्टर मिळणार असल्याचा दावा करण्यात आलाय...स्वत: पंतप्रधान मोदी घोषणा करत असल्याने अनेकांना हे खरं वाटतंय...पण, खरंच अशी सरकारची योजना आहे का...? याची आम्ही पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं चला पाहुयात...
Free Tractor Scheme
Free Tractor Schemesaam tv
Published On: 

...हाच तो व्हिडिओ व्हायरल होतोय...या व्हिडिओत स्वत: पंतप्रधान मोदीच घोषणा करत असल्याचा पाहायला मिळतंय...दावा करण्यात आलाय की, सरकार सर्व शिधापत्रिकाधारकांना मोफत ट्रॅक्टर देणार आहे...पण, खरंच रेशन कार्ड धारकांना आता ट्रॅक्टर मोफत मिळणार आहे का...? अशी कोणती केंद्र सरकारची योजना आहे त्यात ट्रॅक्टर मिळणाराय...? हा व्हिडिओ व्हायरल होत असल्याने अनेकांना उत्सुकता आहे की ट्रॅक्टर मिळवण्यासाठी काय करावं लागेल...? हा विषय सर्वांसाठी महत्त्वाचा आहे...त्यामुळे

20 सेकंदांचा हा व्हिडिओ आहे...या व्हिडिओची सुरुवात पंतप्रधान मोदींच्या, मित्रांनो, 8 तारीख लक्षात ठेवा, या वाक्याने होते...हे बोलून पंतप्रधान मोदी व्हिडिओमधून निघून जातात आणि व्हिडिओ बनवणारा त्या योजनेबद्दल माहिती देऊ लागतो...व्हिडिओत पंतप्रधान दिसत असल्याने अनेकांना यावर विश्वास बसू लागलाय... ही अशी योजना असेल तर सगळ्यांसाठी फायद्याचंच आहे... पण, अशी योजनाच नसेल तर गोरगरीबांची फसवणुकही होऊ शकते... त्यामुळे आमच्या व्हायरल सत्य टीमने याची सत्यता जाणून घेण्यासाठी पडताळणी सुरू केली... त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...

व्हायरल व्हिडिओ पूर्णपणे बनावट

केंद्र सरकारने अशी कोणतीही घोषणा केलेली नाही

पंतप्रधान मोदींच्या व्हिडिओत छेडछाड

मोफत ट्रॅक्टरसाठी कुणालाही पैसे देऊ नका

कुणी फॉर्म भरून घेत असेल तर विश्वास ठेवू नका

असे व्हिडिओ व्हायरल करून लोकांना आमिष दाखवलं जातं...मोफत मिळणार म्हणून अनेकजण पैसेही द्यायला तयार होतात...मात्र, मोफत देण्याच्या नावावर फसवणूक होऊ शकते...त्यामुळे अशा दाव्यांवर विश्वास ठेवू नका...आमच्या पडताळणीत रेशनकार्ड धारकांना मोफत ट्रॅक्टर मिळणार असल्याचा दावा असत्य ठरलाय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.