Shreya Maskar
हिवाळ्यात कमी बजेटमध्ये भारतात फिरण्यासाठी अनेक सुंदर ठिकाणे आहेत. मुंबईहून प्रवास सुरू करणार असाल, तर ट्रेन किंवा बसने पोहोचता येणारी ठिकाणे निवडल्यास प्रवासाचा खर्च आणखी कमी ठेवता येईल.
मनाली हिमाचल प्रदेशात वसलेले सुंदर ठिकाण आहे. बर्फाच्छादित पर्वत, सोलंग व्हॅली आणि थंड हवेचा आनंद येथे घेता येतो.
वाराणसी उत्तर प्रदेशातील ठिकाण आहे. गंगा घाट, काशी विश्वनाथ मंदिर, गंगा आरती आणि जुन्या शहरातील गल्ल्या अनुभवता येतात.
कर्नाटकला गेल्यावर गोकर्णला नक्की भेट द्या. शांत समुद्रकिनारे, बीच ट्रेकिंग आणि सुंदर सूर्यास्त येथे पाहायला मिळतो. गोव्यापेक्षा कमी खर्चात बीच व्हेकेशन प्लान होतो.
फ्रेंच वास्तुकला, सुंदर कॅफे, समुद्रकिनारे आणि शांत वातावरण यांचाय आनंद घ्यायचा असेल तर पुदुच्चेरीला नक्की जा. हे ठिकाण सोलो ट्रिपसाठीही बेस्ट आहे.
राजस्थानमधील जयपूर फिरायला परदेशी पर्यटकही गर्दी करतात. हवा महल, आमेर किल्ला, सिटी पॅलेस आणि रंगीबेरंगी बाजार पाहून तुमचे डोळे दिपतील.
ट्रेन किंवा सरकारी बसने प्रवास करा. महागड्या हॉटेलऐवजी होमस्टे किंवा हॉस्टेल निवडा. ग्रुपमध्ये गेल्यास रूम आणि कॅबचा खर्च विभागता येतो.
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.