Shreya Maskar
थंडगार हवा, धुक्याने वेढलेले डोंगर, हिरवीगार निसर्गरम्य ठिकाणे, धबधबे आणि ऐतिहासिक किल्ले यांचा आनंद घेण्यासाठी हिवाळा उत्तम आहे. महाराष्ट्रात अशी अनेक सुंदर पर्यटनस्थळे आहेत, जिथे तुम्ही मित्रमंडळी, कुटुंब किंवा जोडीदारासोबत सुट्टीचा आनंद घेऊ शकता.
आर्थर लेक, विल्सन धरण, रंधा धबधबा आणि कळसूबाई शिखर ही येथील प्रमुख आकर्षणे आहेत. हिवाळ्यात आकाश निरभ्र असल्यास रात्री ताऱ्यांनी भरलेले आकाश पाहण्याचा अनुभवही खास असतो.
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी हे हिवाळ्यात फिरण्यासाठी सुंदर ठिकाण आहे. भातसा नदीचे खोरे, भावली धरण, त्रिंगलवाडी किल्ला आणि विपश्यना केंद्र ही येथील प्रमुख आकर्षणे आहेत.
स्वच्छ समुद्रकिनारा, नारळ-सुपारीच्या बागा आणि प्रसिद्ध स्वयंभू गणपती मंदिर ही या ठिकाणाची खास वैशिष्ट्ये आहेत. समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकत सूर्यास्त पाहण्याचा अनुभवही अविस्मरणीय ठरतो.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तारकर्ली हे कोकणातील सुंदर समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे. निळेशार समुद्र, पांढरी वाळू आणि शांत किनारा यामुळे हिवाळ्यात येथे पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. येथे स्कूबा डायव्हिंग, स्नॉर्केलिंग आणि बोटिंगसारख्या जलक्रीडांचा आनंद घेता येतो.
पाचगणी हे शांत आणि निसर्गरम्य पर्यटनस्थळ आहे. येथील थंड हवा, हिरवेगार डोंगर आणि विस्तीर्ण पठार पर्यटकांना विशेष आकर्षित करतात.टेबल लँड, सिडनी पॉइंट, पारसी पॉइंट आणि डेव्हिल्स किचन ही येथील प्रसिद्ध ठिकाणे आहेत.
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील लोकप्रिय थंड हवेचे ठिकाण आहे. येथील वेण्णा तलाव, आर्थर सीट पॉइंट, विल्सन पॉइंट, लिंगमळा धबधबा आणि स्ट्रॉबेरी फार्म ही प्रमुख आकर्षणे आहेत.
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.