Maharashtra Politics 2024 Saam Digital
लोकसभा २०२४

Maharashtra Politics 2024 : 'ठाकरेंकडून संभाजीराजे छत्रपतींचा अपमान'; व्हिडीओ दाखवून उदय सामंतांचा खळबळजनक दावा

Lok Sabha Election 2024 : संभाजीराजेंना तिकीट देण्यासाठी शिवसेनेत येण्याची तसंच शिवसेनेचा प्रचार करण्याची अट घालण्यात आली. त्यांनी नकार देताच त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. हा गादीचा अपमान नाही का असा थेट उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांना विचारलाय.

Sandeep Gawade

संभाजीराजेंचे व्हिडीओ दाखवत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय. संभाजीराजेंना तिकीट देण्यासाठी शिवसेनेत येण्याची तसंच शिवसेनेचा प्रचार करण्याची अट घालण्यात आली. त्यांनी नकार देताच त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. हा गादीचा अपमान नाही का असा थेट उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांना विचारलाय. पाहुयात, यावरील एक खास रिपोर्ट.

लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून प्रचार शिगेला पोहोचलाय. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जाताहेत. अशातच मंत्री उदय सामंतांनी ठाकरे गटाबाबत मोठा गौप्यस्फोट केल्याने खळबळ उडाली आहे. संभाजीराजे छत्रपतींना तिकीट देण्यासाठी शिवसेनेत येण्याची तसंच शिवसेनेचा प्रचार करण्याची अट घालण्यात आली. त्यांनी नकार देताच त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. हा गादीचा अपमान नाही का, असा थेट सवाल उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांना विचारलाय. इतकंच नाही तर संभाजीराजेंचे व्हिडीओ दाखवत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय.

उद्धव ठाकरे यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्याकडून राज्यसभेवेळी कोणता ड्राफ्ट लिहून घेतला. त्यांची कशी अवहेलना झाली याबाबत मोठा गौप्यस्फोटही सामंतांनी केलाय...उदय सामंत यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेत एकच खळबळ उडवून दिली आहे.कोल्हापुरात काँग्रेसनं छत्रपती शाहू महाराजांना उमेदवारी दिली आहे. त्याविरोधात शिंदेंच्या शिवसेनेनं पुन्हा एकदा संजय मंडलिकांना उमेदवारी दिली आहे.

कोल्हापुरात राजर्षी शाहूंच्या गादीला प्रचंड मान आहे. काही दिवसांपूर्वी संजय मंडलिकांना कोल्हापूरच्या गादीबद्दल केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला होता. त्यानंतर महायुतीनं गादीचा अपमान केल्याची टीका मविआकडून केली जात होती. विधानाचा फटका मंडलिकांना बसू नये यासाठी उदय सामंतांनी जुन्या प्रकरणावरून ठाकरे गटाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या राजकारणात आता गादीच्या मान-अपमानाचा मुद्दा केंद्रस्थानी आणला गेलाय.

काही दिवसांपूर्वी खासदार संजय मंडलिकांनी गादीच्या वारसावरून केलेलं वक्तव्य त्यांना चांगलंच भोवलंय. त्यावरून कोल्हापुरात महायुती काही प्रमाणात डॅमेज झाली. आता ठाकरेंवर आरोप करून शिंदेंची शिवसेना डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न तर करत नाही ना, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shukra Gochar 2024: नोव्हेंबर अखेरीस शुक्राचं नक्षत्र गोचर वाढवणार डोकेदुखी; आर्थिक हानी होण्याचा धोका

Air Pollution : राजधानीची हवा अत्यंत विषारी! शाळा बंद, वाहनांना बंदी, दिल्लीमध्ये अनेक निर्बंध

Weather Update : थंडीची चाहूल, कमाल अन् किमान तापमानात घट

Assembly Election: साकोलीचं महाभारत ! जातीय समीकरण कुणाच्या पथ्यावर? पटोलेंपुढे अविनाश ब्राह्मणकरांचं आव्हान

Horoscope Today : काहींना नको असलेल्या गोष्टींचा होईल त्रास, तर कोणाचे शत्रू काढतील डोके वर, वाचा तुमचे आजचे राशिभविष्य

SCROLL FOR NEXT