Devendra Fadnavis : पाकिस्तानने रचलेलं मोठं षडयंत्र त्यांनी कोर्टासमोर आणलं; उज्वल निकम यांचं नाव घेत फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल

Lok Sabha Election 2024 : उज्वल निकम यांनी उमेदवारी घेतल्याबरोबर काही लोकांच्या पोटात कालवा कालव सुरू झाली आहे. हे तेच लोक आहेत की जे आता म्हणतील की मुंबईत बॉम्बस्फोट झाला नाही. असं फेक नरेटीव तयार करतील, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर केली.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Saam Digital

उज्वल निकम यांनी आपल्या आयुष्यात कधीही आरोपीची केस घेतले नाही. पाकिस्तानने रचलेलं षडयंत्र त्यांनी कोर्टासमोर आणलं. पाकिस्तान म्हणत होतं की आमचा कोणताही संबंध नाही.पण उज्वल निकम यांनी नरेंद्र मोदींची मदत घेऊन सगळ्या जगाला पाकिस्तानचं खरं रूप दाखवून दिलं. आतंकवाद्यांना यमसदनी पाठवणारे उज्वल निकम यांचा आम्हाला अभिमान आहे. उज्वल निकम यांनी उमेदवारी घेतल्याबरोबर काही लोकांच्या पोटात कालवा कालव सुरू झाली आहे. हे तेच लोक आहेत की जे आता म्हणतील की मुंबईत बॉम्बस्फोट झाला नाही. असं फेक नरेटीव तयार करतील, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर केली.

अरे वेड्यांनो महापालिकेचा पूल झाल्यावर तुम्ही सांगता आम्ही बांधला, मग त्याचं श्रेय कसं घेता. जगाच्या पाठीवर भारताने लस तयार केली. माझ्या नेत्याच्या नेतृत्वात लस तयार झाली, तुमको मिरची लगी तो मैं क्या करू. प्रेताच्या टाळूवरील लोणी चोरणारे तुम्ही. तुमच्या घोटाळ्याची मालिका मी बाहेर काढणार, अभी शुरुवात हुआ हैं, आगे आगे देखो होता हैं क्या, असा इशारा ठाके गटाला दिला आहे.

मालपाणी मिळवण्याच्या नादात मुंबईतून अनेक उद्योग बाहेर गेले.आता स्टार्टअप कॅपिटल महाराष्ट्र बनलं आहे, सर्वाधिक स्टार्टअप महाराष्ट्रात आहेत. कारण आम्ही लढलो. मुंबईच्या विकासात तुमचा वाटा काय. हे पक्षाचे अध्यक्ष आहेत की गल्लीचे. इट का जवाब पत्थर से देऊ. आमच्यावर येईल तेव्हा ताकद दाखवून देऊ, असं आवाहनही त्यांनी दिली.

Devendra Fadnavis
Lok Sabha Election: पहिल्या दोन टप्प्यात भाजपला कमी मतदान? प्रचारासाठी आता BJP ने तयार केला नवीन गेम प्लॅन?

मुंबईकरांचं नरेंद्र मोदींवर प्रेम आहे. मोदी नसते तर मुंबईतील महत्त्वाकांक्षी प्रकल्प आले नसते. आजच्या निमित्ताने एकच विनंती आहे, विकसित भारताचं ग्रोथ इंजिन महाराष्ट्र आहे, मुंबई आहे. मुंबईत सिमेंट काँक्रीटचे रस्ते बांधताना लक्षात आलं की 50 वर्षे रस्ते बांधायची गरज नाही. कुणाच्या बापाचा बाप मुंबईला महाराष्ट्रापासून तोडू शकत नाही. निवडणूक आली की कोल्हेकुई सुरू होते.

Devendra Fadnavis
Kalyan Lok Sabha: राज ठाकरेंचे जे विचार आहेत, तेच आमचे विचार, मनसे शिवसेनेचा डीएनए एकच: श्रीकांत शिंदे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com