Maharashtra Politics 2024  Saam Digital
लोकसभा २०२४

Maharashtra Politics 2024 : शिरूर मतदारसंघात भाजपला खिंडार; बडा नेता शरद पवार गटात करणार प्रवेश

Lok Sabha Election 2024 : शिरुर लोकसभा मतदारसंघातील खेड आळंदीचे समन्वयक अतुल देशमुख यांची मगधरणी करण्यात भाजपला अपयश आलं आहे. अखेर अतुल देशमुख यांनी भाजपला रामराम ठोकला असून आज सायंकाळी ते राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत.

Sandeep Gawade

रोहिदास गाडगे

Maharashtra Politics 2024

शिरुर लोकसभा मतदारसंघात खेड आळंदीचे समन्वयक अतुल देशमुख यांची मगधरणी करण्यात भाजपला अपयश आलं आहे. अखेर अतुल देशमुख यांनी भाजपला रामराम ठोकला असून आज सायंकाळी ते राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. शरद पवार यांच्या निवासस्थानी पक्ष प्रवेश होणार असून देशमुख राजगुरुनगर येथून पुण्याकडे निघाले आहेत. त्यांच्यासोबत खेड आळंदीतून मोठ्या संख्येने भाजपचे पदाधिकारी, सरपंच,नगरसेवक, बाजारसमिती संचालक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने असल्याची माहिती आहे.

महायुतीत तीनही पक्ष एकत्र आल्यानंतर भाजपमधील अंतर्गत नाराजी आणि अजित पवार गटाचे खेडचे आमदार दिलीप मोहितेपाटील यांच्याशी सतत संघर्ष होत होता. त्यामुळे भाजपमधून बाहेर पडत आहे. पुढच्या काळात ८२ वर्षाच्या योध्याच्या पाठीमागे तरुणांची मोठी ताकद उभी करून अमोल कोल्हेंना विजयाच्या शिखरावर घेऊन जाणार असल्याचा निर्धार, अतुल देशमुख यांनी व्यक्त केला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

महायुतीला काहीसा दिलासा

भाजपचे पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि खेड-आळंदी विधानसभेचे निवडणूक प्रमुख अतुल देशमुख यांनी ऐन लोकसभा निवडणुकीत पक्षाला रविवारी रामराम ठोकला. त्यामुळे शिरुर लोकसभेची (shirur loksabha) राजकीय समीकरणे आता बदलली आहेत. अतुल देशमुख खेड तालुक्यातील भाजपचा आक्रमक चेहरा म्हणून पाहिलं जातं होतं. त्यामुळे देशमुखांच्या राजीनाम्याने आता शिरुर लोकसभेतील महायुतीच्या उमेदवाराला काहीसा धक्का तर आघाडीला दिलासा मिळाला आहे.

आढळरावांच्या उमेदवारीत देशमुखांच्या पक्ष सोडण्याची बीजे

बदलत्या राजकीय परिस्थितीत आपले हाडवैरी स्थानिक आमदार खेड-आळंदीचे अजित पवार राष्ट्रवादीचे दिलीप मोहिते- पाटील यांच्या नेतृत्वात काम करावे लागणार असल्याने देशमुखांनी पक्ष सोडला. पण, त्याला कारणीभूत ठरली आढळराव यांची शिरुर लोकसभेची उमेदवारी.कारण आघाडीचे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शिरुरचे उमेदवार डॉ.अमोल कोल्हे यांना पराभूत करण्यासाठी अजित पवारांनी ही जागा शिंदे शिवसेनेकडून नुसती घेतलीच नाही, तर तेथील उमेदवार सुद्धा त्यांनी त्या पक्षाचा घेतला. म्हणजे शिंदे शिवसेनेचे उपनेते आढळराव यांना राष्ट्रवादीत घेऊन पक्षाचे तिकिट दिले. तेथेच देशमुखांच्या पक्ष सोडण्याची बीजे रोवली गेली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणूक रेंगाळली

Dhokla Recipe : ढोकळा जाड होतो? बॅटर नीट होतंच नाही? वाचा मऊसुत ढोकळ्याची रेसिपी

Face Care: विड्याच्या पानांनी तयार केलेला फॅसपॅक लावा चेहऱ्यावर, १५ मिनिटांत स्किन करेल ग्लो

Pune Ganpati Visarjan: दगडूशेठ गणपतीची बैलगाडी मिरवणूक; केरळ मंदिराच्या प्रतिकृतीसह आकर्षक रथ सजवला|VIDEO

Shocking : शाळेत ११ वर्षीय विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, मुख्याधापकाचं हैवानी कृत्य उघड

SCROLL FOR NEXT