Chhatrapati Shahu Maharaj News: आत्ताचे शाहू महाराज खरे वारसदार नाहीत; खासदार संजय मंडलिक यांचे वादग्रस्त विधान

Maharashtra Election 2024 News | Sanjay Mandlik On Shahu Maharaj: शिंदे गटाचे खासदार आणि कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार संजय मंडलिक यांनी शाहू महाराज छत्रपतींबाबत केलेल्या एका विधानाने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Kolhapur Lok Sabha Election 2024: Sanjay Mandlik Controversial Statement on Chhatrapati Shahu Maharaj
Kolhapur Lok Sabha Election 2024: Sanjay Mandlik Controversial Statement on Chhatrapati Shahu MaharajSaam Tv

Sanjay Mandlik Statement Chhatrapati Shahu Maharaj:

राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीकडून शाहू महाराज छत्रपती आणि तर महायुतीकडून खासदार संजय मंडलिक यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे. एकीकडे शाहू महाराजांना शह देण्यासाठी महायुतीकडून जोरदार मोर्चेबांधणी केली असतानाच शिंदे गटाचे खासदार आणि कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार संजय मंडलिक यांनी शाहू महाराज छत्रपतींबाबत केलेल्या एका विधानाने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आताचे महाराज हे खरे वारसदार आहेत का? ते सुद्धा दत्तकच आहेत. कोल्हापूरची जनताच खरी वारसदार आहे, असं विधान त्यांनी केलं.

काय म्हणाले संजय मंडलिक?

शिवसेना शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांची कोल्हापुरच्या चंदगड तालुक्यातील नेसरी येथे प्रचारसभा पार पडली. या सभेत बोलताना संजय मंडलिक यांनी शाहू महाराज छत्रपती हे खरे वारसदार आहेत का? असा सवाल उपस्थित करत धक्कादायक विधान केले. त्यांच्या या भाषणाचा व्हिडिओ सध्या माध्यमांवर व्हायरल होत आहे.

"या मल्लाला हातच लावायचा नाही. मल्लाला टांगच मारायचे नाही मग ती कुस्ती कशी होणार? अशात गादीचा अपमान झाला की काय, असा कांगावा केला जातो. यानिमित्ताने सांगितले पाहिजे की आत्ताचे महाराज साहेब (Chhatrapati Shahu Maharaj) आहेत हे कोल्हापूरचे आहेत का? वारसदार खरे आहेत का? ते सुद्धा दत्तकच आलेले आहेत.त्यामुळे कोल्हापूरची जनताच खरी वारसदार," असे संजय मंडलिक यावेळी म्हणाले.

संजय मंडलिक यांच्या विधानानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया (पाहा व्हिडिओ)

Kolhapur Lok Sabha Election 2024: Sanjay Mandlik Controversial Statement on Chhatrapati Shahu Maharaj
Maharashtra Politics 2024 : शिरूर मतदारसंघात भाजपला खिंडार; बडा नेता शरद पवार गटात करणार प्रवेश

तसेच "माझे वडील सदाशिवराव मंडलिक साहेबांनी खऱ्या अर्थानं पूर्वगामी विचार जपला. ही शाहू महाराजांची भूमी आहे. राजर्षी शाहू महाराजांनी आपल्याला पुरोगामी विचार शिकवला, समतेचा विचार दिला. इथे राहणारा प्रत्येक माणूस शाहू विचार घेऊन जगतो," असेही संजय मंडलिक म्हणाले. दरम्यान, त्यांंच्या या वादग्रस्त वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Kolhapur Lok Sabha Election 2024: Sanjay Mandlik Controversial Statement on Chhatrapati Shahu Maharaj
Latur Accident: लातूर हळहळलं! गाडीवरील नियंत्रण सुटून भीषण अपघात; बाप- लेकाचा दुर्दैवी अंत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com