Maharashtra Politics 2024  Saam Digital
लोकसभा २०२४

Maharashtra Politics 2024 : महायुतीकडून लोकसभेसाठी समन्वय समिती गठीत; कोणत्या पक्षातील मंत्र्यांचा आहे सहभाग? जाणून घ्या

Sandeep Gawade

Lok Sabha Election 2024

लोकसभा प्रचारासाठी महायुतीतने समन्वय समिती गठीत केली आहे. या समन्वय समितीत तिन्ही पक्षांच्या प्रत्येकी २ मंत्र्याची निवड करण्यात आली आहे. भाजपाकडून गिरीश महाजन, रवीद्र चव्हाण, शिवसेनेकडून शंभुराजे देसाई, उदय सामंत, तर राष्ट्रवादीकडून अजित‌ दादा गटाकडून धनंजय मुंडे, अनिल पाटील या समितीत असणार आहेत. राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या तीनही प्रमुख पक्षात समन्वय रहावा यासाठी ही समिती महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहे.

 महायुतीचा ६ जागांवर तिढा कायम

राज्यात पहिल्या टप्प्यातील प्रचारानं जोर धरलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चंद्रपूरमध्ये पहिली सभा देखील पार पडली. महाविकास आघाडीचे उमेदवार निश्चित झालेत मात्र महायुतीच्या काही जागांचा पेच सुटताना दिसत नाही. विदर्भात 19 एप्रिलला मतदान आहे. निवडणूक तोंडावर आलेली असताना महायुतीतील जागावाटपाचं घोडं अडलंय.

नाशिक, ठाणे, सातारा, संभाजीनगर, पालघर आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग या जागांवर वाद आहे. शिवसेना आपला दावा सोडायला तयार नाही. महायुतीतील तिन्ही पक्षांकडून एकमेकांच्या विरोधात दबावतंत्राचं राजकारण पहायला मिळतंय. दरम्यान ज्या जागांवर उमेदवार घोषित झालेले नाहीत त्या जागाची निवडणूक शेवटच्या टप्प्यांमध्ये आहे. त्यामुळे त्यावर चर्चेतून मार्ग काढू, असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केलाय.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर नाशिकची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळेल असं एकमत झालं होतं. मात्र या जागेवरुन शिवसेना मागे हटायला तयार नाही. ठाणे आणि नाशिकसाठी मुख्यमंत्री शिंदे अटोकाट प्रयत्न करयायेत. महायुतीमध्ये एकमेकांबाबत दबाव तंत्राचा वापर केला जातोय. जर आश्वासन मिळून देखील नाशिकची जागा मिळत नसेल तर साता-यामधून सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांची उमेदवारी जाहीर करू अशी भूमिका राष्ट्रवादीनं घेतली आहे. अशा वादामुळेच आणि बंडखोरी टाळण्यासाठी उमेदवार जाहीर केला जात नाही. दुसरीकडे मविआनं मात्र जागावाटप आणि उमेदवार जाहीर करण्यात सरशी घेतली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT