Maharashtra Politics 2024  Saam Digital
लोकसभा २०२४

Maharashtra Politics 2024 : सांगलीवरून हाय होल्टेज ड्रामा; विश्वजीत कदम, विशाल पाटील यांचा महाविकास आघाडीला पुनर्विचार करण्याचा इशारा

Lok Sabha Election 2024 : सांगली काँग्रेसचा बालेकिल्ला असून महाविकास आघाडीने लोकसभेच्या जागवरून पुनर्विचार करावा, अशी मागणी विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांनी लावून धरली आहे.

Sandeep Gawade

Maharashtra Politics 2024

सांगली काँग्रेसचा बालेकिल्ला असून महाविकास आघाडीने लोकसभेच्या जागवरून पुनर्विचार करावा, अशी मागणी विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांनी लावून धरली आहे. त्यामुळे शिवसेनेतून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नाराज असलेले विशाल पाटील आणि विश्वजीत कदम बंडाच्या पवित्र्यात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे राज्याचं लक्ष या मतदारसंघाकडे लागलं आहे.

महाविकास आघाडीची जागा वाटपाची चर्चा सुरू असतानाच सांगली लोकसभा मतदारसंघात शिवसेनेने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे सुरुवातीपासूनच काँग्रेसने याला विरोध दर्शवला आहे. मात्र कोल्हापूरची जागा काँग्रेससला सुटल्यामुळे सांगलीच्या जागेवर शिवसेनेने दावा केला. यावरून सांगलीत राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

मंगळवारी झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत काँग्रेसने शिवसेनेच्या चंद्रहार पाटील यांना पाठिंबा दिला. त्यामुळे वातावरण आणखी बिघडलं आहे. आज विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांनी सांगलीत पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. सांगली जिल्ह्यातल्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहेत. जिल्ह्यातील वस्तुस्थिती आणि परिस्थिती जाणून घेऊन महाविकास आघाडीने निर्णय घ्यावा. काही दिवसात महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या बरोबर बैठक घेणार आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांची देखील भावना जाणून घेऊन पुढील भूमिका घेतली जाईल, असं विश्वजीत कदम यांनी म्हटलं आहे.

महाविकास आघाडीमधील ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये सांगली लोकसभेच्या जागेवरुन वाद सुरू होता. कालच्या पत्रकार परिषदेत ही जागा ठाकरे गटाकडेच राहणार असून चंद्रहार पाटील हेच उमेदवार असतील, असं जाहीर केले आहे. मात्र सांगलीमधून चंद्रहार पाटील यांना उमेदवार मिळाल्यानंतर काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील, तसेच आमदार विश्वजित कदम हे नॉटरिचेबल असल्याच्या चर्चा सुरू होत्या. अखेर आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन नाराजी व्यक्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: सासरच्या जाचाला कंटाळून आयुष्य संपवलं, गर्भवती महिलेने चिमुकलीसह विहिरीत मारली उडी

Crime: संसारात ढवळाढवळ, जावयाची सटकली; सासूला कायमचं संपवलं, शरीराचे १९ तुकडे करून...

Haryana: दोन गटात हाणामारी; दगडफेकीनंतर वाहनं पेटवली, अनेकजण जखमी

Vastu Tips For Money: झोपताना उशीखाली ठेवा 'या' गोष्टी, पैशांची होईल भरभराट

Ajit Pawar: राहुल गांधींच्या मतचोरीच्या आरोपांवर अजित पवारांनी दिलं बारामतीचं उदाहरण, म्हणाले...

SCROLL FOR NEXT