Maharashtra Politics 2024  Saam Digital
लोकसभा २०२४

Maharashtra Politics 2024 : बारामतीसाठी राजकीय धूमशान; बारामतीत सुप्रिया सुळे की सुनेत्रा पवार?

Lok Sabha Election 2024 : 'अबकी बार, सुनेत्रा ताई पवार'' असा नारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्याच्या प्रचारसभेत दिलाय. पुण्य़ामध्ये महायुतीची प्रचारसभा पार पडली. यावेळी शिंदे बोलत होते. बारामतीत परिवर्तन होणार आणि भाकरी फिरवायची वेळ आलीय, असंही शिंदेंनी म्हटलंय.

Sandeep Gawade

'अबकी बार, सुनेत्रा ताई पवार'' असा नारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्याच्या प्रचारसभेत दिलाय. पुण्य़ामध्ये महायुतीची प्रचारसभा पार पडली. यावेळी शिंदे बोलत होते. बारामतीत परिवर्तन होणार आणि भाकरी फिरवायची वेळ आलीय, असंही शिंदेंनी म्हटलंय. तर या लोकसभेत इतिहास घडेल आणि बारामतीची सून दिल्लीत जाणारच असा निर्धार देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय. दरम्यान बारामतीची लक्ष्मी दिल्ली जाणार का पाहुयात या रिपोर्टमधून.

बारामतीत शरद पवार आणि अजित पवार यांच्यात अस्तित्वाची लढाई सुरु आहे.. नणंद विरुद्ध भाजय अशा या सर्वाधिक हाय व्होल्टेज लढतीत दोन्ही उमेदवारांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलाय.. बारामतीत महायुतीने सुनेत्रा पवारांसाठी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं.. यानंतर प्रचाराच्या सभेत शिंदे फडणवीसांनी अबकी बार सुनेत्रा पवारचा नारा दिलाय.

दरम्यान ही निवडणूक गावकी भावतीची नसल्याचं म्हणत भावनिक प्रचाराला बळी पडू नका असं अजित पवारांनी म्हटलंय. तर सुप्रिया सुळेंनीही पुण्याच्या सभेतून सुप्रिया सुळेंनी मी शांताबाई पवारांची नात असून रडणार नाही लढणार असा पलटवार केलाय.

विकासाच्या मुद्द्यावरून अजित पवार सातत्याने बारामतीकरांना साद घालतायत.. तर मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार असं म्हणत शरद पवारांनी अप्रत्यक्षरित्या जुन्या जाणत्या वयोवृद्ध मतदारांना साद घालण्याचा प्रयत्न केलाय.. आता बारामतीकर दिल्लीवारीसाठी सुनेला पाठवणार की लेकीला हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Earth Threat : 116 दिवसात जग नष्ट होणार? शास्त्रज्ञाच्या दाव्याने जगावर मोठं संकट, वाचा स्पेशल रिपोर्ट

Viksit Bharat Rozgar Yojana : साडेतीन कोटी तरूणांना 15 हजार मिळणार, स्वातंत्र्यदिनी मोदींचं गिफ्ट; कोण ठरणार पात्र?

Maharashtra Live Update: गिरगावचा महाराजा मुखदर्शन, गिरगावच्या महाराजा साकारतोय जगन्नाथ भव्यरूप

Accident : स्वातंत्र्यदिनासाठी निघाला, बाईक स्लीप झाली अन् कंटेनरच्या खाली आला, विद्यार्थ्याचा दुर्दैवी अंत

Sesame Seeds: पांढरे तीळ खाण्याचे 'हे' आश्चर्यकारक फायदे महितीये का?

SCROLL FOR NEXT