Maharashtra Politics 2024  Saam Digital
लोकसभा २०२४

Maharashtra Politics 2024 : भुजबळ नाराज, महायुतीला टेंशन?; महाजनांची भुजबळ फार्मवर दीड तास चर्चा

Sandeep Gawade

भरत मोहळकर, साम टीव्ही प्रतिनिधी

नाशिकच्या मतदानापूर्वीच छगन भुजबळ नाराज असल्यामुळे महायुतीचं टेंशन वाढलंय. भुजबळांची नाराजी दूर करण्यासाठी भाजपचे संकटमोचक गिरीज महाजनांनी थेट भुजबळ फार्मवर धाव घेतली. यामुळे मात्र शिंदे गटाचे नाशिकचे उमेदवार हेमंत गोडसे आणि दिंडोरीच्या भाजप उमेदवार भारती पवार यांना घाम फुटलाय. नाशिकमध्ये नेमकं काय सुरू आहे त्यावरचा हा रिपोर्ट.

नाशिकच्या उमेदवारीवरून सुरूवातीला नाराज झालेले भुजबळ आता ओके आहेत असं वारंवार सांगणा-या महायुतीच्या नेत्यांना नाशिकच्या मतदानापूर्वी भुजबळांचे उंबरठे झिजवावे लागत असल्याचं दिसतंय. भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांनी भुजबळांच्या भुजबळ फार्मवर जाऊन त्यांच्याशी तब्बल दीड तास चर्चा केली. मात्र या दीड तासांत काय झालं ते महाजनांच्या तोंडूनच ऐका.

नाशिकची उमेदवारीचा पत्ता कापला गेल्यानंतर नाराज भुजबऴ महायुतीच्या उमेवारांच्या प्रचारात कुठेही दिसले नाहीत. ते दिसले केवळ पंतप्रधान मोदींच्या पिंपळगावच्या सभेत. ओबीसी मोर्चांमध्ये राज्यभर तुफान भाषणं करणारे भुजबळ लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या मंचावरून पूर्णपणे गायब झाले होते. तेवढंच नव्हे तर घाटकोपर दुर्घटनेत भाजप आणि ठाकरे गटात आरोप प्रत्यारोप झाल्यानंतर भुजबळांनी उद्धव ठाकरेंची पाठराखण केली, भुजबळ एवढ्यावरच थांबले नाहीत तर पवार आणि ठाकरेंबाबत राज्यात सहानुभूती असल्याचं सांगत महायुतीच्या नेत्यांना घाम फोडला. हीच संधी साधत शरद पवार गटाच्या जयंत पाटलांनी याला हवा दिली.

एकीकडे शिरूरच्या मतदानानंतर अजित पवार कुठेही सभा आणि रॅलींसाठी फिरकले नाहीत. तर दुसरीकडे भुजबळही नाशिक जिल्ह्याच्या प्रचारात सक्रीय नाहीत. त्यामुळे नाशिकमधील शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे आणि दिंडोरीच्या भाजप उमेदवार भारती पवार यांचं टेंशन वाढलंय. भुजबळांचं संपूर्ण नाशिक जिल्ह्यात मोठी बळ आहे. ते नाराज असणं महायुतीला परवडणार नाही. त्यामुळे मतदानाच्या आधी नाशिकचं महायुतीवरील संकट टाळण्यासाठी भाजपचे संकटमोचक भुजबळांच्या भेटीला गेले. मात्र भुजबळांची नाराजी दूर झाली की नाही हे 4 जूनच्या निकालातच स्पष्ट होणार.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी मिळणार? समोर आली मोठी अपडेट

Shukra Nakshatra Gochar: शुक्र ग्रहाने नक्षत्रामध्ये केला बदल; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Politics: हरियाणाची पुनरावृत्ती होणार, राज्यात महायुतीचे सरकार येणार: CM एकनाथ शिंदेंना विश्वास

Maharashtra Weather: पुढील ५ दिवस पावसाचे! 'या' जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMD कडून यलो अलर्ट जारी; वाचा आजचे हवामान

Horoscope Today : धार्मिक कार्यावर पैसा खर्च होईल, मानसिक ताण जाणवेल; तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

SCROLL FOR NEXT