Maharashtra Politics 2024 : 'अजित पवारांवरील आरोप सिद्ध झाले नाहीत'; फडणवीसांची अजितदादांना जाहीर क्लीन चिट

Lok Sabha Election 2024 : अजित पवार यांच्यासोबत सत्तासमीकरण जुळवल्यानंतर सिंचन घोटाळ्यावरून विरोधक भाजपला नेहमीच घेरत आलेत. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पहिल्यांदाच सिंचन घोटाळ्यावर थेट भूमिका घेतलीय.
Maharashtra Politics 2024
Maharashtra Politics 2024Saam Digital

तन्मय टिल्लू, साम टीव्ही प्रतिनिधी

अजित पवार यांच्यासोबत सत्तासमीकरण जुळवल्यानंतर सिंचन घोटाळ्यावरून विरोधक भाजपला नेहमीच घेरत आलेत. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पहिल्यांदाच सिंचन घोटाळ्यावर थेट भूमिका घेतलीय. आरोप चुकीचे नव्हते पण अजित पवारांचा त्यात हात नव्हता अशी क्लीन चिट फडणवीसांनी दिलीय. फडणवीसांनी काय भूमिका मांडली आणि आताचं टाईयमिंग का साधलं ? त्यावरचा हा रिपोर्ट.

अजित पवार यांच्यासोबत सत्तासमीकरण जुळवल्यानंतर सिंचन घोटाळ्यावरून विरोधक भाजपला नेहमीच घेरत असतात. कारण राज्यातल्या भाजपच्या नेत्यांसोबतच खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या जाहीर सभांमधून सिंचन घोटाळ्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसला टार्गेट करत होते. कारण अजित पवार आणि सुनील तटकरे हे तत्कालीन जलसंपदा मंत्री असताना 70 हजार कोटींचा कथित घोटाळ्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. त्यामुऴे अजित पवारांची राष्ट्रवादी भाजपासोबत गेल्यामुळे या प्रकरणावर भाजप नेते थेट बोलणं टाळतात. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंडियन एक्स्प्रेस या वृत्तपत्राच्या मुलाखतीत बोलताना पहिल्यांदाच सिंचन घोटाळ्यावर थेट भूमिका मांडलीय. फडणवीस नेमकं काय म्हटले ते पाहूयात.

अजित पवार, सुनील तटकरे आणि अन्य नेत्यांवर सिंचन घोटाळ्याप्रकरणी केलेले आरोप चुकीचे नव्हते. सिंचनाबाबत कंत्राटं देताना अटी आणि नियम बदलण्यात आले होते. या खात्याचे प्रमुख म्हणून अजित पवारांवरही आरोप करण्यात आले होते. सिंचन घोटाळ्याचे 2010 आणि 2014 साली मी आरोप केल्यानंतर तपास यंत्रणांनी चौकशी केली. तेव्हा या घोटाळ्यात अजित पवार यांचा हात असल्याचं तपास यंत्रणांना दिसून आलं नाही. तपास यंत्रणांवर आपण विश्वास ठेवायला हवा.

Maharashtra Politics 2024
Maharashtra Politics 2024 : प्रमोद महाजन असते तर मोदी पंतप्रधान असते का? इंडिया आघाडीच्या सभेतून उद्धव ठाकरेंनी सांगितलं खरं कारण

महाराष्ट्राचे दोन लालू, पवार-तटकरे जेलमध्ये घालू अशा घोषणांनी भाजप आमदार सभागृह दणाणून सोडायचे. सिंचन घोटाळ्यावर आरोपांची राळ उठवण्यात आल्यानंतर तत्कालीन आघाडी सरकारला चितळे समिती गठीत करावी लागली होती. आता या आरोपातून फडणवीसांनीच तपास यंत्रणांचा हवाला देत अजित पवार आणि तटकरेंना दोषमुक्त केलंय.

गेल्या 15 वर्षांपासून राज्याचं संपूर्ण राजकारण ज्या सिंचन घोटाळ्याभोवती फिरत होतं त्याच घोटाळ्याच्या आरोपांना बगल देत भाजपनं अजित पवारांशी हातमिळवणी केली. त्यामुळे भाजपचा जमिनीवरचा कार्यकर्ता नाराज होता. आता थेट फडणवीसांनीच अजित पवार आणि तटकरेंना जाहीर क्लीनचिट दिलीय. मतदानाच्या अखेरच्या टप्प्यात फडणवीसांनी ही भूमिका घेतल्यानं तर्कवितर्कांना उधाण आलंय.

Maharashtra Politics 2024
Maharashtra Politics 2024 : इंडिया आघाडीतील कोणाला पडतायेत पंतप्रधानपदाची स्वप्न?; एकनाथ शिंदेंनी नाव घेत शिवतीर्थावरून केली सडकून टीका

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com