Maharashtra Politics 2024 Saam Digital
लोकसभा २०२४

Maharashtra Politics 2024 : अवघ्या 4 जागांवर अजित पवार गटाची बोळवण; जागावाटपाच्या वाटाघाटीत शरद पवारच सरस

Lok Sabha Election 2024 : महायुतीत प्रवेश करताना 9 मंत्रिपदं मिळाल्यानंतर अजित पवार गटातील कार्यकर्त्यांमध्ये आनंदाच वातावरण होतं. मात्र लोकसभेच्या जागावाटपात पक्षाची अवघ्या 4 जागांवर बोळवण झाल्यामुळे नाराजीचं वातावरण आहे.

Sandeep Gawade

सत्तेत सहभागी होताना अजित पवार गटाला जेवढा मान सन्मान मिळाला तेवढाच जागावाटपात मिळालेला दिसत नाहीये.महायुतीत प्रवेश करताना 9 मंत्रिपदं मिळाल्यानंतर अजित पवार गटातील कार्यकर्त्यांमध्ये आनंदाच वातावरण होतं. मात्र लोकसभेच्या जागावाटपात पक्षाची अवघ्या 4 जागांवर बोळवण झाल्यामुळे नाराजीचं वातावरण आहे. दरम्यान कार्यकर्त्यांमध्ये कोणतीही नाराजी नसल्याचं स्पष्टीकरण आनंद परांजपे यांनी दिलंय.

दुसरीकडे नाशिकच्या जागेवरही पाणी सोडावं लागल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजीच्या चर्चांना बळ आलंय. छगन भुजबळ यांनी महायुतीमधील तिढा सोडवण्यासाठी आपण माघार घेत असल्याचं म्हटलंय.एकूणच जागावाटपाच्या वाटाघाटीत अजित पवारांपेक्षा शरद पवारच सरस ठरले आहेत.

अजितदादांपेक्षा साहेबच सरस !

महाविकास आघाडीच्या जागावाटपात शरद पवार आपल्या पक्षासाठी 10 जागा मिळवण्यात यशस्वी ठरले. तर महायुतीच्या जागावाटपात अजित पवारांना आपल्या पक्षासाठी केवळ 5 जागा मिळवता आल्या. त्यामध्ये बारामतीच्या जागेवर सुनेत्रा पवार, रायगडच्या जागेवर तुनील तुटकरे, शिरूरच्या जागेवर शिवाजीराव आढळराव, धाराशिवमध्ये अर्चना पाटील आणि परभणीतून महादेव जानकर यांच्या रासपसाठी जागा सोडलीय. त्यामुळे एक घरचा, एक पक्षाचा, दोन आयात, एक बाहेरचा अशी अजित पवार गटाची अवस्था झालीय. महायुतीसोबतच्या वाटाघातील अजित पवार गटाच्या पदरात फक्त दोनच जागा पडल्यामुळे कार्यकर्त्यांची घोर निराशा झालीय.

अजित पवार गटाच्या कोट्यातील एका जागेवर महादेव जानकर हे स्वतःच चिन्ह घेऊन उभे आहेत. तर दुसरीकडे साताऱ्यामध्ये राष्ट्रवादीचा गड असलेल्या ठिकाणी घड्याळ चिन्ह हद्दपार झाल्यातच जमा आहे. याचा परिणाम विधानसभा निवडणुकीसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीवर होऊ शकतो. त्यामुळे मूळ पक्षातल्या उमेदवारांना संधी देण्याऐवजी आयात उमेदवार आणि भाजपचा वरचष्मा असलेल्या उमेदवाराला संधी दिल्याने पक्षाच्या विस्तारावरतीच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : शिंदे आणि केदार दिघंचे कार्यकर्ते आमने-सामने, कोपरी पाचपाखाडीत गोंधळ

Most Relaxing Places: धकाधकीच्या जीवनापासून सुटका हवीय तर 'या' शांत ठिकाणांना द्या भेट

Yugendra Pawar News : बारामतीत युगेंद्र पवारांची सांगता सभा, प्रचाराच्या तोफा थंडावल्या

Vinesh Phogat: आम्ही तेव्हाच सेफ राहू जेव्हा तुमचे नेते महिला अत्याचार थांबवतील, विनेश फोगाट यांचा भाजपवर निशाणा

Washim Vidhan Sabha : वाशिम विधानसभा मतदारसंघात बंडखोर उमेदवाराचा भाजपात प्रवेश; महायुतीला होणार फायदा

SCROLL FOR NEXT