Maharashtra Politics 2024 Saam Digital
लोकसभा २०२४

Maharashtra Politics 2024 : शेतकऱ्याला ६ हजार रुपये देतात अन् १२ हजार रुपये हिसकावून घेतात; उद्धव ठाकरेंनी मांडलं PM किसान योजनेमागचं गणित

Lok Sabha Election 2024 : शेतकऱ्यांच्या खिशात हात घालून 12 हजार हिसकावून नेले जातात आणि शेतकऱ्याला तुटपुंजे 6 हजार रुपये देतात, असा खते आणि पीएम किसान योजनेचा हिशोब मांडताना उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर आरोप केला आहे.

Sandeep Gawade

शेतकरी दरवर्षी किमान एक लाखाचं खत विकत घेतो. त्यावर 18 टक्के जीएसटी लावली जाते. एक लाखाचं खत घेतलं तर जीएसटी 18 हजार होते, मात्र शेतकऱ्यांना पीएम किसानमधून वर्षाला ६ हजार रुपये देतात. म्हणजे नरेंद्र मोदींच्या खिशात १२ हजार रुपये जातात. शेतकऱ्यांच्या खिशात हात घालून 12 हजार हिसकावून नेले जातात आणि शेतकऱ्याला तुटपुंजे 6 हजार रुपये देतात, असा खते आणि पीएम किसान योजनेचा हिशोब मांडताना उद्धव ठाकरे यांनी, अशा माणसाचा तुम्ही पुन्हा सन्मान करणार का? असा सवाल शेतकरी आणि सामान्य जनतेला केला.

शेतकऱ्यांच्या अश्रू पुसण्यासाठी मोदी, अमित शहा, मुख्यमंत्री आले होते का? अडीच वर्षे सत्ता मिळाली, अडीच वर्षात अडीच लाखाचं कर्ज माफ केलं. मात्र नरेंद्र मोदींच असं झालंय देशातील जनता मरो अगर जगो, पण मला पंतप्रधान करा. 2047 मध्ये उत्पन्न दुप्पट होणार असं सांगतात. मात्र आज रात्री काय खायचं, हा प्रश्न जनतेसमोर असतो.

गेल्या दहा वर्षात अडीच वर्ष सोडले तर साडेसात वर्षात किती उद्योग राज्यात आणले आणि किती तरुणांना रोजगार दिला याचा आधी हिशोब दिला पाहिजे. सर्व उद्योगधंदे गुजरातला पळवले जात आहेत. तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात गुजरातचे नाही. महाराष्ट्राच्या हक्काचं जर गुजरातला पळवणार असाल, तर महाराष्ट्राच्या मातीत पुन्हा पाय ठेवू देणार नाही, असा इशारा दिला आहे.

तुम्ही विदर्भात साडे ७ वर्षात किती उद्योग आणले ते सांगा? तुम्ही शेतकऱ्याला सुखी ठेवू शकत नाही, तरुणाला नोकऱ्या देत नाहीत. गुजरातला सगळे उद्योग पाठवताय, तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात गुजरातचे नाही. १० वर्ष तुम्हाला दिली, तुमच्या थापा ऐकून १० वर्ष निघून गेली. नोटबंदी केली, रांगेत उभा कोण होतं? नोटबंदी नंतर तुम्हला काय मिळालं? भाजपचा व्हॅक्युम क्लीनर झालाय, भाजपची माणसं फिरतात भ्रष्टाचार केलेल्या माणसाला आपल्या पक्षात घेतात आणि मोदी गॅरेंटी म्हणतात. मात्र इंडिया आघाडी ३०० पेक्षा जास्त जागा जिंकते आहे त्यात बुलढाणाची जागा सुद्धा आहे, असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Food Digestion: खाल्लेले अन्न पचायला किती वेळ लागतो?

Farali Misal Recipe : झणझणीत फराळी मिसळ, उपवासाला एकदा करून तर बघा

Rain Alert : वाशिम जिल्ह्यात तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा; अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस

Maharashtra Live News Update : बीडमध्ये क्लासेसमधील मुलींचे लैंगिक छळ प्रकरण; दुसरा गुन्हा दाखल

Harbour Line : हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत; रविवारच्या दिवशी प्रवाशांचे मेगा हाल

SCROLL FOR NEXT