Maharashtra Loksabha Election:  Saamtv
लोकसभा २०२४

Loksabha Election: लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा हाणामाऱ्यांनी गाजला! महाराष्ट्रात ३ ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये राडा

Maharashtra Loksabha Election: मतदानादरम्यान अनेक मतदान केंद्रांवर राडा, हाणमारी, आरोप-प्रत्यारोप अन् शाब्दिक बाचाबाची झाल्याचे प्रकार समोर येत आहेत. धाराशिव, सांगली तसेच हातकणंगलेमध्ये अशाच मारहाणीच्या घटना घडल्या आहेत.

Gangappa Pujari

राज्यातील ११ लोकसभा मतदार संघामध्ये लोकसभेचे तिसऱ्या टप्प्यतील मतदान पार पडत आहे. मतदानादरम्यान अनेक मतदान केंद्रांवर राडा, हाणमारी, आरोप-प्रत्यारोप अन् शाब्दिक बाचाबाची झाल्याचे प्रकार समोर येत आहेत. धाराशिव, सांगली तसेच हातकणंगलेमध्ये अशाच मारहाणीच्या घटना घडल्या आहेत.

सांगोल्यात दोन गटात राडा...

मतदानादरम्यान दोन गटात मारहाण झाल्याचा प्रकार सांगोल्यातून समोर आला आहे. सांगोला तालुक्यातील महूद येथे शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरात हाणामारी झाली यामध्ये दोन्ही गटातील पाच ते सहा कार्यकर्ते गंभीर जखमी झाले आहेत जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हातकणंगलेत शिंदे गट- ठाकरे गट आमने सामने...

त्याचबरोबर हातकणंगले मतदार संघातही शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार धैर्यशिल माने यांचे कार्यकर्ते अन् ठाकरे गटाचे सत्यजित पाटील सरुडकर यांचे कार्यकर्ते आमने सामने आल्याचे पाहायला मिळाले. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील वाळवा तालुक्यालील साखराळे गावातील मतदान केंद्रावर हा प्रकार घडला. यावेळी दोन्ही गटातील कार्यकर्त्यांकडून एकमेकांना धक्काबुक्की करण्यात आली.

धाराशिवमध्ये राडा, एकाचा मृत्यू..

दरम्यान, धाराशिवमध्ये शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यावर चाकू हल्ला करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली. धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील पाठसांगवी गावाच्या मतदान केंद्रावर हा प्रकार घडला. यामध्ये एकाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope : शब्द खरा ठरणार, आर्थिक फायदा होणार; ५ राशींच्या लोकांचे आयुष्य बदलणार

जगात अणुबॉम्बची भीती, भारताकडे संजीवनी; रेडिएशनवर भारताचा रामबाण उपाय

‘AI फॉर एज्युकेशन’, १० लाखाहून अधिक मुलांचे शिक्षण होईल ए वन; संपर्क फाउंडेशनची राज्यात ४२ कोटींची गुंतवणूक

iran and israel war News : गॅसनं वाढवलं तळीरामाचं टेन्शन; देशात दारुचा दुष्काळ पडणार?

बीड पुन्हा हादरलं! कृष्णा आंधळे आणि जयराम चाटे यांच्या टोळीकडून एकावर डोळ्यात मिरची पावडर टाकून जीवघेणा हल्ला

SCROLL FOR NEXT