Maharashtra Loksabha Election Devendra Fadnavis  ANI
लोकसभा २०२४

Maharashtra Election: मुंबईसह राज्यात संथगतीने मतदान होत असल्याच्या तक्रारी; देवेंद्र फडणवीसांनी घेतली गंभीर दखल

Maharashtra Loksabha Election : मतदानाच्या संथ गतीवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांनी गंभीर दखल घेत निवडणूक आयोगाकडे मतदानाची गती वाढवण्यासाठी विनंती केलीय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गणेश कावडे, साम प्रतिनिधी

मुंबई: महाराष्ट्रातील १३ मतदारसंघात लोकसभेसाठी मतदान प्रक्रिया चालू आहे. या मतदारसंघातील २६४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आज सकाळपासून राज्यातील १३ ठिकाणी मतदानाची प्रक्रिया सुरू झाली, मात्र दुपारी एक वाजेपर्यंत महाराष्ट्रात २७.७८ टक्के% इतके मतदान झाले. मतदानाच्या संथ गतीवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांनी गंभीर दखल घेत निवडणूक आयोगाकडे मतदानाची गती वाढवण्यासाठी विनंती केलीय.

मुंबई तसेच परिसरात संथ गतीने मतदान होत असल्याच्या तक्रारी अनेक ठिकाणांवरुन येत असल्याने निवडणूक आयोगाच्या यंत्रणेने त्यात तातडीने लक्ष घालून मतदानाचा वेग कसा वाढेल, याकडे लक्ष द्यावे, अशी विनंती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोगाकडे केली आहे.

तसेच मुंबई आणि मुंबई उपनगर अशा दोन्ही जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा करुन मतदारांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, तसेच मतदानाची गती वाढेल, याकडे लक्ष देण्यास सांगितले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि राज्यातील अखेरच्या टप्प्यात मुंबईतील ६ मतदारसंघांसह ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर, नाशिक, दिंडोरी आणि धुळे अशा १३ मतदारसंघांत मतदान होत आहे.

पाचव्या टप्प्यातील एकूण १३ मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुमारे सरासरी ४८.६६ टक्के मतदान झाले आहे. तर लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला मुंबई शहर जिल्ह्यातील ३१- मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात आज सकाळी ७ वाजेपासून सुरुवात झाली. ३१ - मुंबई दक्षिण मतदारसंघातील एकूण ६ विधानसभा मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत अंदाजे सरासरी ४४.२२ टक्के मतदान झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: TCS प्रकरणातील फरार आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी

Bigg Boss Marathi 6 Winner: 'तन्वी कोलते हा ब्रॅण्ड बनून...'; 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी जिंकल्यावर तन्वी कोलते झाली भावूक

Belly Fat: सकाळी या 5 सवयी करा फॉलो, पोटाचा घेर होईल आठवड्यातच कमी

Ladki Bahin Yojana: उरले शेवटचे १० दिवस, लाडक्या बहि‍णींना मार्च-एप्रिलचे ₹३००० कधी येणार? वाचा सविस्तर

Bhendwal Bhavishyvani 2026: यंदा देशात मुसळधार पाऊस, महापूर येणार; भेंडवळच्या घटमांडणीचा अंदाज जाहीर, वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT