Anna Hazare । अण्णा हजारे  SaamTvnews
लोकसभा २०२४

Anna Hajare: ईडीसारखे गुन्हे असलेले राजकारणी नको; निष्कलंक उमेदवार निवडा', ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंचे आवाहन

Maharashtra Loksabha Election 2024: मतदान केंद्रावर नागरिक, राजकीय मंडळी तसेच सेलिब्रिटी गर्दी करताना दिसत आहेत. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही अहमदनगरमध्ये मतदानाचा हक्क बजावला.

Gangappa Pujari

सुशिल थोरात, अहमदनगर|ता. १३ मे २०२४

राज्यातील ११ लोकसभा मतदार संघांसाठी आज मतदान होत आहे. सकाळपासून मतदान केंद्रावर नागरिक, राजकीय मंडळी तसेच सेलिब्रिटी गर्दी करताना दिसत आहेत. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही अहमदनगरमध्ये मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी मतदारांच्या हातात देशाची चावी असल्यामुळे ही चावी योग्य पद्धतीने योग्य कुलपाला लावून योग्य उमेदवार निवडावा असे आवाहन नागरिकांना केले.

काय म्हणाले अण्णा हजारे?

"आज लोकशाहीचा मोठा उत्सव असून या उत्सवात सर्वांनी सहभागी व्हावं आणि मतदान करताना चारित्र्यशील आणि निष्कलंक माणसाला मतदान करावे. मतदारांच्या हातात देशाची चावी असल्यामुळे ही चावी योग्य पद्धतीने योग्य कुलपाला लावून योग्य उमेदवार निवडावा," असे आवाहन अण्णा हजारे यांनी केले.

तसेच "पैसे घेऊन मतदान करणे हे देशाचं दुर्दैव असल्याचे सांगत हा शहीद झालेल्या शहिदांचा अपमान आहे. म्हणूनच निष्कलंक उमेदवारांना निवडून द्या. ईडीसारखे गुन्हे उमेदवारांवर आणि राजकारणांवर दाखल नसावेत, अशाच उमेदवारांना निवडून द्या, असेही ते यावेळी म्हणाले.

यावेळी बोलताना अण्णा हजारे यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरही कथित मद्यघोटाळा प्रकरणावरुन जोरदार टीका केली. दारूच्या मोहाच्या पैशात तो डुबला असल्यामुळे त्यांनी हा भ्रष्टाचार केला आहे, असे अण्णा हजारे यावेळी म्हणाले. तसेच अशा लोकांना निवडून देऊ नका असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Death : विमान अपघातानंतर अजित पवारांच्या मृतदेहाची ओळख कशी पटली?

अजित पवारांचा अपघात कसा झाला? घटनास्थळी फॉरेन्सिक टीम दाखल, ब्लॅक बॉक्स सापडला|VIDEO

Maharashtra Live News Update: अजित पवारांच्या निधनाची बातमी कळताच शाळेतील मुलही भावुक

Ajit Pawar Death News LIVE Updates : अजित पवारांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी विद्या प्रतिष्ठान विद्यानगरी चौक मैदानात नागरिकांची मोठी गर्दी

विमान तिरकं होताच विपरीत घडलं; अजित पवारांच्या अपघाताचा नवा सीसीटीव्ही समोर, VIDEO

SCROLL FOR NEXT