Mahayuti  Saam TV
लोकसभा २०२४

Loksabha Election 2024: महायुतीच्या जागावाटपावर महत्वाची अपडेट; शिवसेनेनं सांगितलं कोणत्या आणि किती जागा वाट्याला येणार?

Mahayuti Seat Sharing Formula Update: महायुतीच्या जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली असून शिवसेना शिंदे गट १६ जागा लढवणार असल्याचा दावा पक्ष प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केला आहे. तसेच नाशिक, सिंधुदूर्ग, संभाजीनगर या तिन्ही जागा आमच्याच असल्याच्याचेही ते म्हणालेत.

Gangappa Pujari

रामू ढाकणे, छत्रपती संभाजीनगर|ता. १ एप्रिल २०२४

Sanjay Shirsat On Seat Sharing Formula:

राज्यातील महायुतीमध्ये लोकसभेच्या जागा वाटपावरुन जोर- बैठका सुरू आहेत. तसेच नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरुन कलगितुरा सुरू असल्याचेही पाहायला मिळत आहे. अशातच आता महायुतीच्या जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली असून शिवसेना शिंदे गट १६ जागा लढवणार असल्याची माहिती पक्ष प्रवक्ते संजय शिरसाट यांनी दिली आहे. (Maharashtra Loksabha Election 2024)

काय म्हणाले संजय शिरसाट?

"महायुतीच्या जागावाटप संदर्भात मुख्यमंत्र्याच्या बैठका सुरू आहेत, सर्व जागा निवडून येईल अशी रणनीती आहे. दोन दिवसात कोण कुठली जागा लढवणार हे स्पष्ट होईल, असे म्हणत नाशिक, सिंधुदूर्ग, संभाजीनगर या तिन्ही जागा आमच्याच असेल असा आमचा अंदाज आहे, चर्चा असणाऱ्या ३ जागा आम्हालाच मिळतील," असा दावा संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी केला आहे.

शिवसेना १६ जागा लढवणार?

तसेच "भाजपने (BJP) २४ जागा जाहीर केल्या आहेत, उर्वरित जागांची तयारी झाली आहे, आम्ही १६ ते १८ जागा लढवण्याचा तयारीत आहेत १६ पेक्षा कमी जागा आम्हाला मिळणार नाहीत. छत्रपती संभाजीनगरची जागा महत्वाची आहे. इथूनच शिवसेना प्रमुखांनी सुरुवात केली होती. कालच बैठक झाली आहे. हीजागा शिवसैनिकाला सुटावी अशी आमची मागणी आहे, अंतिम निर्णय मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) घेतील," असेही संजय शिरसाट यावेळी म्हणाले.

उद्धव ठाकरेंवर टीका..

दरम्यान, यावेळी बोलताना संजय शिरसाट यांनी इंडिया आघाडीच्या (India Aaghadi) दिल्लीमधील सभेवरुन उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) निशाणा साधला. "कालच्या भाषणाला शून्य प्रतिसाद होता. क्रमवारी पहिली तर स्वाभिमान कुठं गेला ते दिसले, आता तुमची जागा खूप खाली गेली आहे, पुन्हा स्वाभिमानाच्या गप्पा मारू नयेत," असा टोला शिरसाट यांनी लगावला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)


सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : भांडणानंतर रागाच्या भरात बायको घर सोडून गेली, नंतर नवऱ्यानं आई आणि मुलांसह जे केलं ते पाहून सारेच हादरले

Eating Too Fast: घाईघाईत जेवल्याने काय होतं?

Kharadi Rave Party: पार्टीत ड्रग्ज सापडलं..;पुण्यातील रेव्ह पार्टीवर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

गाणं लावण्यावरून वाद; शिंदेंच्या नेत्याकडून तरूणावर प्राणघातक हल्ला, काळंनिळं होईपर्यंत मारलं

Maharashtra Live News Update: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरण; सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

SCROLL FOR NEXT